वाढते प्रदूषण रोखण्‍यासाठी राज्‍य सरकारकडून उपाययोजना !

पुणे – राज्‍यात अनेक शहरांमध्‍ये प्रदूषणाची पातळी वाढल्‍याने नागरिकांच्‍या आरोग्‍याला धोका निर्माण झाला आहे. नागरिकांचे आरोग्‍य जपण्‍यासाठी पुढील उपाययोजना चालू केल्‍या आहेत, असे आरोग्‍य सेवा विभागाचे सहसंचालक डॉ. प्रताप सिंह सारणीकर यांनी सांगितले. हवा गुणवत्ता निर्देशांक २०० च्‍या पुढे गेल्‍याने सर्व जिल्‍हे आणि महापालिकांचे प्रशासन यांना आवश्‍यक प्रतिबंधात्‍मक उपाययोजना अन् जनजागृती करण्‍याच्‍या सूचना दिल्‍या आहेत. राज्‍यातील १७ शहरांमध्‍ये वायू प्रदूषणामुळे होणार्‍या तीव्र आजारांचे सर्वेक्षण करून वायू प्रदूषणाशी संबंधित आजार आणि रुग्‍णांच्‍या मृत्‍यूची आकडेवारी नोंदवली जाणार आहे, तसेच वायूप्रदूषणाशी संबंधित ‘हॉटस्‍पॉट’ ओळखून तेथे आवश्‍यक आरोग्‍य सेवा पुरवल्‍या जातील.