सोलापूर येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन
सोलापूर, ८ नोव्हेंबर (वार्ता) – पॅलेस्टाईन येथील ‘हमास’ या आतंकवादी संघटनेने इस्रायलवर अत्यंत भीषण आक्रमण करून १ सहस्र ४०० हून अधिक लोकांची निर्घृण हत्या केली. शेकडो महिलांवर बलात्कार करण्यासह लहान-कोवळ्या मुलांचाही शिरच्छेद केला. अशा राक्षसी ‘हमास’ला तात्काळ आतंकवादी संघटना घोषित करावे आणि ‘हमास’, तसेच तिला पोसणार्या पॅलेस्टाइनच्या समर्थनार्थ देशभरात मोर्चे काढणार्यांवर आणि आंदोलने करणार्यांवर ‘राष्ट्रीय सुरक्षा कायद्या’अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. बापू ढगे यांनी केली. येथील छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार (पूनम गेट) येथे झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनात ते बोलत होते. आंदोलनातील मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार उत्कर्ष देवकुळे यांनी स्वीकारले.
या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. दत्तात्रय पिसे, श्री. किशोर जगताप यांनीही मनोगत व्यक्त केले, तर सूत्रसंचालन श्री. मिनेश पुजारे यांनी केले. या आंदोलनाला शहरातील धर्मप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतात हेतूतः ‘हलाल’ उत्पादनांची मागणी केली जात असून हिंदु व्यापार्यांना व्यवसाय करण्यासाठी ‘हलाल प्रमाणपत्र’ घ्यावे लागत आहे. या अघोषित हलाल सक्तीच्या विरोधात समस्त हिंदूंनी ‘हलालमुक्त दिवाळी’ साजरी करण्याचा निर्धार करावा’, असे आवाहनही आंदोलनात करण्यात आले.
वैशिष्ट्यपूर्ण – आंदोलनात २ धर्मप्रेमींनी घरातील कामे बाजूला ठेवून प्रथम आंदोलनात सहभागी होण्यास प्राधान्य दिले.
संपादकीय भूमिकाआतंकवाद्यांचे समर्थन करणार्यांवर पोलीस स्वत:हून कारवाई का करत नाहीत ? |