दिवसभर ३ ऋतूचक्राचा अनुभव !
मुंबई – अरबी समुद्रात अल्प दाबाचा पट्टा सिद्ध झाल्यामुळे वातावरणात सातत्याने पालट होत आहेत. दिवसभर ऊन असते, तर पहाटे आणि रात्री थंडीचे प्रमाण वाढते. काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.
राज्याच्या काही भागात पुढील दोन ते तीन दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मध्यम ते हलक्या पावसाच्या सरी कोसळतील किंवा काही ठिकाणी वातावरण कोरडे किंवा ढगाळ राहील.
पालटत्या हवामानाचा परिणाम आरोग्यावर होत आहे. वाढत्या थंडीसह हवेची गुणवत्ताही बिघडत आहे. धुके आणि धूलिकण यांमुळे मुंबई, पुणे, नागपूर आणि देहली यांसह अनेक शहरांत प्रदूषण वाढले आहे.