सौरभ चंद्राकर याच्‍यासह ३१ जणांविरोधात गुन्‍हा नोंद !

‘खिलाडी’ हे अवैध बेटिंग ‘अ‍ॅप’ चालवल्‍याचे प्रकरण

सौरभ चंद्राकर

मुंबई – मुंबई पोलिसांनी पहिल्‍यांदाच ‘महादेव बेटिंग अ‍ॅप’चा प्रवर्तक सौरभ चंद्राकर याच्‍यासह ३१ जणांविरोधात गुन्‍हा नोंदवला आहे. जुगार आणि फसवणूक यांच्‍या कलमांतर्गत मुंबई पोलिसांनी गुन्‍हा नोंदवला; मात्र हा गुन्‍हा ‘महादेव अ‍ॅप’ऐवजी ‘खिलाडी’ हे अवैध बेटिंग ‘अ‍ॅप’ चालवल्‍याप्रकरणी नोंदवण्‍यात आला आहे.

माटुंगा येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बनकर यांच्‍या तक्रारीवरून गुन्‍हा नोंदवण्‍यात आला आहे. तक्रार प्रविष्‍ट केल्‍यानंतर न्‍यायालयाने माटुंगा पोलिसांना गुन्‍हा नोेंदवण्‍याचे आदेश दिले होते. आरोपीने ‘खिलाडी’ या ‘अ‍ॅप’वरून सरकार आणि अन्‍य लोकांची १५ सहस्र कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. सर्वजण जुगार आणि अन्‍य खेळ खेळत होते.

संपादकीय भूमिका

अशांना कठोर शिक्षाच करायला हवी !