छत्रपती संभाजीनगर – शहरात १७ सप्टेंबर या दिवशी म्हणजे ७ वर्षांनी मंत्रीमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी रामा उपाहारगृहात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्री यांचे वास्तव्य असेल. यासह ‘ताज’, ‘अमरप्रीत’ आणि ‘अजंता अॅम्बेसेडर’ ही उपाहारगृहे, तसेच अन्य ठिकाणी प्रशासकीय अधिकारी आणि सुरक्षारक्षक यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
६ जिल्ह्यांतील पोलिसांचा बंदोबस्त !
या बैठकीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यासाठी ६ जिल्ह्यांतून पोलिसांचा बंदोबस्तही मागवण्यात आला आहे. या मंत्रीमंडळ बैठकीच्या निमित्ताने काही मार्गांत पालटही करण्यात आला आहे.