‘गूगल’ आस्‍थापन तक्रारदाराला देणार ७७३ कोटी रुपये !

गूगलने व्‍यावसायिक लाभासाठी वापरकर्त्‍याचे ठिकाण शोधल्‍याचा आरोप

नवी देहली – इंटरनेटवरील सर्च इंजिन असणार्‍या ‘गूगल’विरुद्ध कॅलिफोर्निया येथील अ‍ॅटर्नी जनरल रॉब बोन्‍टा यांनी नुकताच एक खटला प्रविष्‍ट करण्‍यात आला होता. यात गूगलकडून वापरकर्त्‍यांची दिशाभूल केल्‍याचा आरोप करण्‍यात आला होता. या प्रकरणी गूगलने ७ सहस्र कोटी रुपयांची भरपाई द्यावी, अशी मागणी तक्रारदाराने केली होती. त्‍यावर गूगलने आरोप फेटाळत तडजोड करण्‍याची सिद्धता दर्शवली. यासाठी गूगलने तक्रारदाराला ७७३ कोटी रुपये देण्‍याचे आश्‍वासन दिले आहे.

मनाई असूनही गूगलने व्‍यवसायिक लाभासाठी तक्रारदाराचे ‘लोकेशन ट्रॅक’ (व्‍यक्‍ती प्रत्‍यक्ष उपस्‍थित असलेले ठिकाण) केल्‍याचा आरोप तक्रारदाराने केला होता.