जालना येथील आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ आज कोल्हापूर बंद !
जालना येथे आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराचा निषेध करण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने ५ सप्टेंबरला कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली आहे.
जालना येथे आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराचा निषेध करण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने ५ सप्टेंबरला कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली आहे.
मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शिवतीर्थावरील (पोवई नाक्यावरील) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती मूर्तीस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. नंतर जिजाऊ वंदना घेण्यात आली.
मनोज जरांगे म्हणाले की, विनाकारण केवळ बैठकांचे दरवाजे खुले आणि चर्चेचे गुर्हाळ हे आता आरक्षणासाठी लढणार्या पिढीला अपेक्षित नाही. सरकारने काही सकारात्मक निर्णय घेतले असतील, तर त्यांचे लोक येऊन सांगतील.
ऋषिमुनींना सूक्ष्मातून मिळणार्या ज्ञानामुळे संशोधन करावे न लागता क्षणात सूक्ष्मातीसूक्ष्म सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतात आणि ती अंतिम सत्य असल्यामुळे कोणाला त्यांत पालट करता येत नाहीत.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
राजावर नियंत्रण ठेवणारी सामान्य लोकांची ‘समिती’ आणि तज्ञांची ‘सभा’ या २ आद्य लोकशाही संस्थांचा उल्लेख ‘ऋग्वेदा’मध्ये आढळतो. त्या अर्थाने ‘ऋग्वेद’ हा लोकशाहीचा आद्य उद़्गार आहे’, असे म्हणता येईल.
गोळेगाव येथील मराठा मोर्चा समन्वय समितीचे कार्यकर्ते अनिल पाटील बनकर यांनी शहरातील बाबासाहेब आंबेडकर चौक येथे ४ सप्टेंबर या दिवशी स्वतःची दुचाकी पेटवून दिली, तसेच महाराष्ट्र सरकारचा निषेध करत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या विरोधात घोषणा दिल्या.
जालना येथील अंतरवाली सराठी गावात ‘मराठा क्रांती मोर्चा’वर पोलिसांकडून केलेल्या लाठीमाराचे पडसाद महाराष्ट्रभर उमटत आहेत. अनेक ठिकाणी राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्या पेटवण्यात, तसेच फोडण्यात आल्या आहेत.
आंदोलनाच्या वेळी सर्वसामान्यांची प्रवासात होणारी आणि अन्य गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना काढाव्यात !
पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी पातळीवर लाठीमार करण्याचा अधिकार असतो. मराठा आरक्षणाची मागणी करणार्यांवर लाठीमार करण्याचा आदेश मंत्रालयातून देण्यात आलेला नाही, असे स्पष्टीकरण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
‘मराठा क्रांती मोर्चा’तील आंदोलक लोकशाही मार्गाने आंदोलन करत होते. हे आंदोलक आतंकवादी नाहीत. ते शांततेच्या मार्गाने उपोषण करत होते. त्यांच्यावर या सरकारने अमानुषपणे पोलिसांच्या साहाय्याने लाठीमार केला.