आदिवासी खेळांचा क्रीडा विभागाच्या स्पर्धेत समावेश करण्यात येणार ! – संजय बनसोडे, क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री

खेळाडूंना केंद्रस्थानी मानून क्रीडा विभागाचे निर्णय घेण्यात येत आहेत. सर्वसामान्य, होतकरू आणि गरीब कुटुंबातील खेळाडूंना शासकीय योजनांचा लाभ मिळाला पाहिजे. त्यासाठी सराव आणि स्पर्धेसाठी त्यांना आवश्यक ते साहाय्य करण्यात येणार आहे.

जीवनातील प्रत्येक क्षणी संत साहित्याचा सहवास आवश्यक !  – ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे

संतांच्या हातून लिहिले गेलेले साहित्य परिसासारखे प्रभावी असते. त्यात मानवी जीवनाचे सोने करण्याचे सामर्थ्य आहे. त्यामुळेच आपल्या जीवनातील प्रत्येक क्षणी संत साहित्याचा सहवास आवश्यक आहे, असे राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे यांनी सांगितले.

औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यांचे मूळ नाव कायम ठेवून याचिका निकाली !

औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन्ही जिल्ह्यांच्या आणि महसूल विभागाच्या नामांतराची अंतिम अधिसूचना राज्य सरकारने काढली नाही. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने आव्हान याचिका निकाली काढली.

आई-वडिलांचा सांभाळ न करणार्‍या मुलांची वारस नोंद रहित करणार !

संत दामाजीनगर (तालुका मंगळवेढा) ग्रामपंचायतीचा निर्णय

यशाचे गमक !

भारताचे ‘चंद्रयान-३’चे यश अनुभवण्याचा क्षण हा प्रत्येक भारतियासाठी आनंदाचा आणि गौरवाचा क्षण होता. प्रत्येक भारतियाला या यशामुळे एवढा आनंद झाला, तर ज्या शास्त्रज्ञांनी ही मोहीम राबवली, त्यांना किती आनंद झाला असेल ?

छत्रपती संभाजीनगर येथील अजिंठा नागरी बँकेत ४० सहस्र ठेवीदारांच्या ४०० कोटी रुपयांच्या ठेवी !

‘भारतीय रिझर्व्ह बँके’ने निर्बंध लादल्यामुळे अजिंठा नागरी सहकारी बँकेत अनुमाने ४० सहस्र ठेवीदारांच्या ४०० कोटी रुपयांच्या ठेवी आहेत.

‘डेंग्यू’चा प्रसार रोखण्यासाठी तातडीने उपाय करून ६ सप्टेंबरपर्यंत अहवाल सादर करा !

असे निर्देश देण्याची वेळच का येते ? महानगरपालिका प्रशासन स्वतःहून रोगप्रतिबंधात्मक उपाय का काढत नाही ?

पुणे जिल्ह्यात २ ठिकाणी बिंदूदाबन शिबिर पार पडले !

सनातन संस्थेच्या वतीने पुणे जिल्ह्यातील सनातनच्या साधकांसाठी पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड अशा २ ठिकाणी प्रत्येकी ३ दिवसांचे शिबिर पार पडले. पुणे येथे २२ ते २४ ऑगस्ट आणि पिंपरी-चिंचवड येथे २५ ते २७ ऑगस्ट या कालावधीत हे शिबिर पार पडले.

नाशिक येथे प्रयोगशाळेतील अधिकार्‍याला लाच घेतल्याप्रकरणी अटक !

सरकारी जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेतील वरिष्ठ अनुजीव साहाय्यक वैभव सादिगले यांना शहरातील एका ‘केटरिंग’ (अन्न पुरवण्याचा व्यवसाय) व्यावसायिकाला ‘पाण्याच्या नमुन्यांचा अहवाल चांगला आहे’, असा निर्वाळा द्यायचा होता.