संत दामाजीनगर (तालुका मंगळवेढा) ग्रामपंचायतीचा निर्णय

सोलापूर – आई-वडिलांचा सांभाळ न करणार्या मुलांची वारस नोंद रहित करण्याचा निर्णय संत दामाजीनगर ग्रामपंचायतीने घेतला आहे. अशा मुलांना ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात येणार्या सर्व सुविधाही बंद करण्यात येणार आहेत. आई-वडिलांना वृद्धाश्रमात पाठवण्याच्या वाढत्या घटना लक्षात घेऊन ३० ऑगस्ट या दिवशी ग्रामसभेत हा निर्णय घेण्यात आला. याविषयी परिसरातील सर्व वृद्धाश्रमांना ग्रामपंचायतीच्या वतीने पत्रव्यवहार केला जाणार आहे. ग्रामपंचायतीच्या परिसरातील ज्येष्ठ नागरिक किंवा वृद्ध वृद्धाश्रमात आढळल्यास संबंधित मुलावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे सरपंच जमीर सुतार यांनी सांगितले. (कुटुंबव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी कायद्याचा बडगा उचलण्याची वेळ येणे, हे समाज अधोगतीकडे जात असल्याचे द्योतक आहे. त्यामुळे मुलांवर भारतीय संस्कृती, परंपरा आणि नीतीमूल्ये यांचे संस्कार वेळीच करणे आवश्यक. – संपादक)
ह.भ.प. विनायक केशव कुलकर्णी यांना शिर्डी येथे ‘महाराष्ट्र गुणगौरव समाजरत्न’ पुरस्कार प्रदान !
दोडामार्ग येथे सेवानिवृत्त वृद्ध व्यक्तीची २ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक
शेतकर्यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी साहाय्यक कृषी अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित !
मुलींमध्ये शौर्य आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण आवश्यक ! – प्रा. (सौ.) ज्योती वाघमारे, खासदार, शिवसेना
तुर्भे विभागात विद्युत् पुरवठा वारंवार खंडित; जनता त्रस्त !
स्थानांतरासाठी शिक्षकाकडून २५ सहस्र रुपयांची लाच घेतांना अधिकारी डी.सी. कुंभार यांना अटक