मुंबई उच्च न्यायालयाचे महापालिकेला निर्देश !
नागपूर – नागपूर शहरात ‘डेंग्यू’ रोगाचा प्रसार नियंत्रित करण्यासाठी तातडीने उपाययोजना काढून ६ सप्टेंबरपर्यंत कार्यवाहीचा अहवाल सादर करा, असे निर्देश नागपूर खंडपिठाने नागपूर महापालिकेला ३१ ऑगस्ट या दिवशी दिले आहेत. महापालिका ‘डेंग्यू’ रोगाचा प्रसार नियंत्रित करण्यामध्ये अपयशी ठरली आहे, अशी जनहित याचिका नागपूर खंडपिठात प्रविष्ट करण्यात आली होती. त्यावर सुनावणी करतांना खंडपिठाने हे निर्देश दिले आहेत.
असे निर्देश देण्याची वेळच का येते ? महानगरपालिका प्रशासन स्वतःहून रोगप्रतिबंधात्मक उपाय का काढत नाही ? |