माजी जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांना अटक !

पोलिसांनी खरे यांची चौकशी केली असता त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे त्यांच्यावरील संशय बळावल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली.

‘भारतरत्न’ नव्हे, ‘जुगाररत्न’चे फलक दाखवून आमदार बच्चू कडू यांचे सचिन तेंडुलकर यांच्या घरासमोर आंदोलन !

पैसा महत्त्वाचा नाही, देश महत्त्वाचा आहे, हे सचिन तेंडुलकर यांनी लक्षात घेतले पाहिजे. त्यांनी विज्ञापन सोडावे किंवा भारतरत्न तरी परत करावा, असे आवाहन या वेळी बच्चू कडू यांनी केले.

अदानी यांच्या माध्यमातून १ बिलीयन डॉलर विदेशात पाठवण्यात आले ! – राहुल गांधी, काँग्रेस

अदानी देशातील विविध मालमत्तांची खरेदी करत आहेत, असा आरोप करत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी या प्रकरणाच्या अन्वेषणाची मागणी केली.

कुटुंबियांचा भ्रष्टाचार उघड करणे, हे राष्ट्रकर्तव्यच !

‘तरुणांनो, आपले आई-वडील भ्रष्टाचार करून पाप करत असले, तर त्यांना पुढील पापांपासून दूर ठेवण्यासाठी त्यांचा भ्रष्टाचार उघड करा आणि तुमची राष्ट्रभक्ती वाढवा ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

पनवेल आणि भिवंडी येथून भांगमिश्रित पदार्थांचा साठा जप्त !

विविध ‘ब्रँड’च्या छोट्या मोठ्या प्लास्टिकच्या पिशव्यांमधून भांगमिश्रित पदार्थांची साठवणूक आणि विक्री करणार्‍यांवर उत्पादन शुल्क विभागाच्या राज्य भरारी पथकाने पनवेल आणि भिवंडी येथे धाड घालून कारवाई केली आहे.

मंत्रालयात बाँब ठेवल्याचा दूरध्वनी, चाकू बाळगणार्‍या एकाला अटक !

निनावी दूरभाष करणारी व्यक्ती नगर जिल्ह्यातील असल्याचे प्राथमिक अन्वेषणात आढळून आले आहे. यानंतर मंत्रालयाची इमारत आणि आजूबाजूच्या परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली. या वेळी कुठेही बाँब सापडला नाही.

मानवी मनोरे रचतांना दुर्घटनाग्रस्त होणार्‍या ७५ सहस्र गोविंदांना विमा संरक्षण ! – संजय बनसोडे, क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री

मंत्री बनसोडे पुढे म्हणाले की, दहीहंडी उत्सव, प्रो-गोविंदा लीगमधील सहभागी मानवी मनोरे रचतांना अपघात होऊन गोविंदांचा मृत्यू होण्याची किंवा त्यांना गंभीर दुखापत होण्याची शक्यता निर्माण होते.

मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांत रक्षाबंधन साजरे !

डोंबिवली येथे सनातन संस्थेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि शिवसेनेचे शहर प्रमुख आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे माजी नगरसेवक श्री. राजेश मोरे यांना श्रीमती अमृता संभूस यांनी राखी बांधली.

सैन्यदलात कार्यरत असणार्‍यांनी कामासाठी माझ्याशी संपर्क साधावा ! – करवीर तहसीलदार

सर्वांनी असा आदर्श ठेवल्यास ‘सरकारी काम ६ मास थांब’, हे चित्र नक्कीच पालटेल !