मंत्रालयात बाँब ठेवल्याचा दूरध्वनी, चाकू बाळगणार्‍या एकाला अटक !

मुंबई – येथील मंत्रालयात बाँब ठेवल्याचा निनावी दूरध्वनी ३१ ऑगस्ट या दिवशी मुंबई पोलिसांना प्राप्त झाला. निनावी दूरभाष करणारी व्यक्ती नगर जिल्ह्यातील असल्याचे प्राथमिक अन्वेषणात आढळून आले आहे. यानंतर मंत्रालयाची इमारत आणि आजूबाजूच्या परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली. या वेळी कुठेही बाँब सापडला नाही; मात्र मंत्रालयात चाकू घेऊन प्रवेश करणार्‍या एका युवकाला पोलिसांनी कह्यात घेतले आहे. प्रवेशद्वारावर बॅग ‘स्कॅन’ करतांना त्यामध्ये चाकू आढळला. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक अन्वेषण चालू आहे.