अश्‍वमेध’ यज्ञाच्‍या निमित्ताने समाजात उत्तम व्‍यवस्‍था उभी करायची आहे ! – मंगल सिंह गढवाल, शांती कुंज हरिद्वार, गायत्री परिवार मुख्‍यालय

अश्‍वमेध यज्ञ म्‍हणजे सूक्ष्म जगतात देवतत्त्वाची वृद्धी करण्‍याचा प्रयोग आहे. या निमित्ताने समाजात जे चांगले लोक आहेत, त्‍यांना संघटित करणे, त्‍यांना समाजनिर्मितीच्‍या कार्यात सहभागी करून घेणे आवश्‍यक आहे.

अपात्रतेविषयी शिवसेनेच्‍या १६ आमदारांचे लेखी म्‍हणणे विधानसभा अध्‍यक्षांना सादर !

या प्रकरणी विधीमंडळाने निर्णय घेण्‍याचा निर्णय न्‍यायालयाकडून देण्‍यात आला होता. ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी याविषयी विधानसभेच्‍या अध्‍यक्षांनी लवकरात लवकर निर्णय घ्‍यावा, यासाठी सर्वोच्‍च न्‍यायालयात याचिका केली होती.

पिंपळगावसह चांदवड बाजार समितीत शेतकर्‍यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडले !

केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्‍या मध्‍यस्‍थीने जिल्‍ह्यातील काही बाजार समितीचे लिलाव पूर्ववत् चालू झाले आहेत. केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात मूल्‍य ४० टक्‍के केल्‍याने ३ दिवसांपासून बाजार समित्‍या बंद होत्‍या.

ज्‍येष्‍ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन

सीमा देव यांचे पुत्र प्रसिद्ध अभिनेते अजिंक्‍य देव यांनी वर्ष २०२० मध्‍ये सीमा देव या ‘अल्‍झायमर्स’ या आजाराने ग्रस्‍त होत्‍या. सीमा देव आणि त्‍यांचे दिवंगत यजमान अभिनेते रमेश देव यांनी ‘आनंद’ या चित्रपटात केलेली भूमिका विशेष गाजली.

मेवात (हरयाणा), देहली आणि मणीपूर येथे दंगल घडवणार्‍यांवर कठोर कारवाई करण्‍याच्‍या मागणीसाठी सोलापूर अन् बीड येथेे आंदोलन !

मणीपूर, देहली आणि मेवात (हरयाणा) दंगलीत सहभागी दंगलखोरांवर ‘बेकायदेशीर कृत्‍य प्रतिबंधक कायदा’, ‘संघटित गुन्‍हेगारी’, ‘राष्‍ट्रीय सुरक्षा कायदा’ आदी कठोर कायद्यान्‍वये गुन्‍हे नोंद करण्‍यात यावेत अशी मागणी हिंदु जनजागृती समितीतर्फे करण्यात आली.

बुद्धीबळातील प्रज्ञावंत !

क्रीडा क्षेत्रात ‘महान’ असण्‍यासह विनम्र आणि सभ्‍य असणारे खेळाडूच क्रीडाप्रेमींच्‍या मनावर अधिराज्‍य गाजवतात !

हिंदूंनो, धर्मशास्‍त्र जाणा !

‘हिंदु धर्मातील सण-उत्‍सव आपल्‍या सर्वांगीण कल्‍याणासाठी आहेत’, हे समजून धर्माचरण करून मनुष्‍यजन्‍माचे सार्थक करून घ्‍या !

अशा शाळांची मान्‍यता रहित करा !

अजमेर (राजस्‍थान) येथील सोफिया शाळेतील सर्व विद्यार्थ्‍यांकडून ‘क्रीडा प्रकारां’च्‍या नावाखाली वैद्यकीय प्रमाणपत्र मागवण्‍यात आले. यामध्‍ये त्‍यांना त्‍यांची कंबर आणि नितंब यांचा आकारही नमूद करण्‍याची सूचना करण्‍यात आली आहे.

ख्रिस्‍ती संस्‍थांच्‍या भयावह कृत्‍यांविषयी मदुराई (तमिळनाडू) खंडपिठाचा निवाडा !

ख्रिस्‍ती सेवेच्‍या नावाखाली भोळ्‍या भाबड्या लोकांना शाळा, शिक्षण, चांगल्‍या नोकर्‍या, आरोग्‍याची काळजी यांसारखी प्रलोभने देतात. या ठिकाणी त्‍यांनी अनाथ मुलींना त्‍यांच्‍या संस्‍थेमध्‍ये भरती केले. त्‍यानंतर त्‍यांचे लैंगिक शोषण केले आणि त्‍यांच्‍यावर अत्‍याचार केले.

नूंह (हरियाणा) येथील दंगल : एक पूर्वनियोजित कारस्‍थान !

हरियाणामधील गुरुग्रामजवळील नूंह (हरियाणा) हिंदूंसाठी धोक्‍याची घंटा आहे. मेवात दंगलीविषयीच्‍या अन्‍वेषणातून आता पुरावे बाहेर येऊ लागले आहेत. यातून हा कसा पूर्वनियोजित कट होता ? हे दिसून येते.