अपात्रतेविषयी शिवसेनेच्‍या १६ आमदारांचे लेखी म्‍हणणे विधानसभा अध्‍यक्षांना सादर !

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर

मुंबई – निवडणूक आयोगाने अधिकृत शिवसेना म्‍हणून मान्‍यता दिलेल्‍या शिवसेनेच्‍या १६ आमदारांनी त्‍यांचे लेखी म्‍हणणे विधानसभेचे अध्‍यक्ष अधिवक्‍ता राहुल नार्वेकर यांना सादर केले आहे. ठाकरे गटाने या आमदारांना अपात्र करण्‍यासाठी सर्वोच्‍च न्‍यायालयात याचिका केली होती.

या प्रकरणी विधीमंडळाने निर्णय घेण्‍याचा निर्णय न्‍यायालयाकडून देण्‍यात आला होता. ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी याविषयी विधानसभेच्‍या अध्‍यक्षांनी लवकरात लवकर निर्णय घ्‍यावा, यासाठी सर्वोच्‍च न्‍यायालयात याचिका केली होती. त्‍यानंतर अध्‍यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्‍ही गटाच्‍या आमदारांना त्‍यांचे लेखी म्‍हणणे सादर करण्‍यासाठी नोटीस पाठवली होती. अद्याप ठाकरे गटाच्‍या आमदारांनी त्‍यांचे लेखी म्‍हणणे अध्‍यक्षांकडे सोपवलेले नाही.