नूंह (हरियाणा) येथील दंगल : एक पूर्वनियोजित कारस्‍थान !

हरियाणामधील गुरुग्रामजवळील नूंह (हरियाणा) हिंदूंसाठी धोक्‍याची घंटा आहे. मेवात दंगलीविषयीच्‍या अन्‍वेषणातून आता पुरावे बाहेर येऊ लागले आहेत. यातून हा कसा पूर्वनियोजित कट होता ? हे दिसून येते. ‘हिंदु समाजाचे खच्‍चीकरण करणे, त्‍यांच्‍या श्रद्धास्‍थानांना धोका निर्माण करणे, तिथे कार्यरत असलेल्‍या हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांना पद्धतशीरपणे अपकीर्त करणे आणि दहशतीचे वातावरण निर्माण करणे’, असे चालू असते; पण हिंदूंना दंगलीचे खलनायक ठरवण्‍यासाठी ब्रजमंडल यात्रा आणि गोरक्षक मोनू मानेसर यांचे निमित्त पुढे केले जात आहे. यामध्‍ये साम्‍यवादी, प्रसिद्धीमाध्‍यमे आणि तथाकथित विचारवंत आघाडीवर आहेत. नूंहमध्‍ये मोठ्या प्रमाणात भडकलेला हिंसाचार नियंत्रणात आला असला, तरी परत त्‍याचा कधी स्‍फोट होईल ? हे सांगता येणे कठीण आहे.

१. दंगलीला निमित्त जलाभिषेक यात्रेचे !

नूंह येथील दंगलीतील हिंसाचाराचे एक दृश्‍य

नूंह परिसरात विश्‍व हिंदु परिषदेद्वारे ब्रजमंडल जलाभिषेक यात्रेचे आयोजन करण्‍यात आले होते. यात्रा गुरुग्राम-अलवर येथील राष्‍ट्रीय महामार्गावर आली, तेव्‍हा धर्मांध, जिहादी मुसलमान तरुणांच्‍या टोळक्‍याने त्‍यांच्‍यावर दगडफेक करण्‍यास प्रारंभ केला. त्‍यानंतर या हिंसाचाराने इतके रौद्र रूप धारण केले की, धर्मांध, जिहादी मुसलमान जमावाने शासकीय आणि खासगी वाहनांना लक्ष्य करत जाळपोळ चालू केली. या दंगलीत आतापर्यंत ५ जणांचा मृत्‍यू झाला असून तेे सर्व जण हिंदू आहेत. त्‍यातील २ जण गणवेशधारी होमगार्ड होते. १३० पेक्षा अधिक हिंदू गंभीर घायाळ झाले आहेत.

२. गोरक्षक मोनू मानेसरचा व्‍हिडिओ दंगलीसाठी केवळ निमित्त !

मोनू मानेसर हा बजरंग दलाचा कार्यकर्ता असून ‘गोरक्षक’ म्‍हणून संपूर्ण हरियाणात त्‍याचा नावलौकिक आहे. त्‍याने ‘आपण यात्रेनिमित्त नूंहला येत आहोत’, असा व्‍हिडिओ सामाजिक माध्‍यमांवर प्रसारित केला होता. ‘त्‍याला कोणत्‍याही परिस्‍थितीत नूंहला येऊ देणार नाही’, असे तेथील धर्मांध, जिहादी मुसलमान समाजाने अगदी सामाजिक माध्‍यमांवर ही आव्‍हान देण्‍यास प्रारंभ केला होता; मात्र मोनू मानेसरचा तो व्‍हिडिओ हे दंगलीसाठी केवळ निमित्त होते. खरेतर मेवात जाळलेच जाणार होते. मेवातमध्‍ये शोभायात्रा रोखून हिंदूंच्‍या श्रद्धेला ठेचायचे आणि उर्वरित हिंदु समाजाला मेवातमधून कसे पळवून लावावे, याची सिद्धता अनेक दिवसांपासून चालू होती. मोनू मानेसरचा व्‍हिडिओ ही एक भाकडकथा रचून धर्मांध जिहादी स्‍वत:ला वाचवण्‍याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत.

३. धर्मांध, जिहादी दंगलखोरांकडे शस्‍त्रे आली कुठून ?

या यात्रेच्‍या आधी नूंह पोलीस, जिल्‍हा प्रशासन, विश्‍व हिंदु परिषद, बजरंग दल आणि जमियत उलेमा-इ-हिंद यांच्‍या प्रतिनिधींची एक सविस्‍तर बैठक पार पडली होती. या बैठकीमध्‍ये ‘यात्रेत कोणत्‍याही प्रकारची शस्‍त्रे आणली जाणार नाहीत, या आश्‍वासनानंतरच यात्रेला अनुमती देण्‍यात आली होती’, अशी माहिती पोलीस उपायुक्‍त प्रशांत पनवर यांनी दिली आहे. ‘आमचा विरोध धार्मिक यात्रेला नसून फक्‍त यात्रेकरूंच्‍या शस्‍त्र बाळगण्‍याला आहे’, अशी जमियत उलेमा-इ-हिंदचे सदस्‍य मौलाना याहिया करीमी यांनी उर्मट प्रतिक्रिया दिली होती.

हिंदूंकडे असून असून शस्‍त्रे असलीच, तर अधिकाधिक बाबा भोलेनाथचे त्रिशूळ असू शकले असते; मात्र पोलिसांनी घातलेल्‍या अटीमुळे तेही नव्‍हते. असे असतांना यात्रेवर आक्रमण करणार्‍या धर्मांध जिहादी मुसलमान दंगलखोरांकडे आयत्‍या वेळी इतक्‍या मोठ्या प्रमाणावर शस्‍त्रास्‍त्रे आली कुठून ? लाठ्या, लोखंडी रॉड, हातोडे, देशी कट्टे, मोठ्या प्रमाणात दगडांचा साठा, गॅस सिलेंडर, गाड्या आणि पोलीस ठाणे पेटवून देण्‍यासाठी वापरलेले आग लावण्‍याचे सर्व साहित्‍य (यात पेट्रोल बाँबही असण्‍याची शक्‍यता वर्तवण्‍यात आली आहे), काचेच्‍या बाटल्‍या या हत्‍यारांचा अनेक लिंकमध्‍ये मिळून उल्लेख आहे. त्‍यामुळे हे अचानक घडलेले नसून पूर्वनियोजित आक्रमण असल्‍याचा निष्‍कर्ष आहे.       (क्रमश:)

– पूनम पवार (साभार : ‘विश्‍व संवाद केंद्र, कोकण’चे फेसबूक)


या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/714420.html