सिंधुदुर्ग : सावंतवाडी तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का

हा धक्का ३.० रिश्टर स्केलचा असल्याने या परिसरात कोणत्याही प्रकारची जीवित आणि वित्त हानी झाली नाही. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

गोव्यातील पारंपरिक गणेशमूर्तीकारांमध्ये व्यवसाय बंद पडण्याची भीती !

मूर्तीकारांच्या मते त्यांना आवश्यक अशी चिकण माती मिळत नाही. मूर्ती बनवण्यासाठी पुरेशा प्रमाणात कारागीर मिळत नाहीत. नवीन पिढी या व्यवसायात उतरू पहात नाही. केवळ पारंपरिक व्यवसाय म्हणून हा व्यवसाय जिवंत ठेवला आहे.

गोव्यातील जंगलांत ५ वाघांचा अधिवास

विशेष म्हणजे गोव्यातील म्हादई अभयारण्याला ‘व्याघ्र प्रकल्प’ म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव राज्य वन्य जीव मंडळाने फेटाळणे आणि उच्च न्यायालयाने ३ मासांच्या आत व्याघ्र प्रकल्प घोषित करण्याविषयी आदेश देणे या वादाच्या पार्श्वभूमीवर वर्ष २०२२च्या व्याघ्रगणनेचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे !

कुठे शास्त्रज्ञ, तर कुठे ऋषि-मुनी !

‘कुठे परग्रहावर जाणारे यान शोधले की, विज्ञानाचे कौतुक करणारे बुद्धीप्रामाण्यवादी, तर कुठे सूक्ष्म देहाने विश्वातच नाही, तर सप्तलोक आणि सप्तपाताळ यांतही क्षणार्धात सूक्ष्मातून जाऊ शकणारे ऋषि-मुनी !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

रत्नागिरीत महसूल सप्ताहाच्या निमित्ताने विविध उपक्रम !

महसूल सप्ताहानिमित्ताने येत्या १ ऑगस्ट या दिवशी महसूल विभागाकडून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्‍या समर्थनार्थ सकल हिंदु समाजाचे आंदोलन !

यापुढील काळात काँग्रेसला ‘जशास-तसे’ उत्तर दिले जाणार असल्‍याची चेतावणी !

नाशिक येथे पालिका घेणार पीओपीच्‍या श्री गणेशमूर्ती विक्री न करण्‍याविषयीचे हमीपत्र !

‘पीओपीच्‍या श्री गणेशमूर्तींनी प्रदूषण होत नाही’, असे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. त्‍यामुळे गोदावरीचे प्रदूषण होऊ नये, यासाठी नदीमध्‍ये कारखान्‍यांद्वारे सोडले जाणारे घातक रसायनयुक्‍त पाणी थांबवणे आवश्‍यक आहे !

पाणी ओसरल्यावर तातडीने दुरुस्ती करणार ! – कार्यकारी अभियंता विवेक सोनार

पाण्याच्या दबावाने खोरनिनको कालव्याचे अस्तरीकरण निखळले

सहकार्यातून व्‍यावसायिक प्रगतीकडे !

‘शिक्षण ते नोकरी-व्‍यवसाय’, असा साधारणपणे व्‍यावसायिक वाटचालीचा क्रम असतो. कुणी अभ्‍यासात हुशार असतो, तर कुणी जेमतेम असतो, तर काही जण ‘ढ’ असतात.