रत्नागिरी – महसूल सप्ताहानिमित्ताने येत्या १ ऑगस्ट या दिवशी महसूल विभागाकडून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सप्ताहातील विविध कार्यक्रमांमध्ये १ ऑगस्ट या दिवशी विभागातील उत्कृष्ट अधिकारी-कर्मचारी यांचा सत्कार करणे, महाराष्ट्र महसूल अधिनियम १९६६ च्या कलम १५५ खालील प्रकरणे तलाठ्यांमार्फत इ-हक्क पोर्टलवर सेतू सुविधा केंद्रामार्फत नोंदवून तहसीलदारांकडे पाठवणे, गाव तेथे स्मशानभूमी/दफनभूमी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहीम राबवणे; २ ऑगस्ट या दिवशी-युवा संवादमध्ये दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेशासाठी आवश्यक असणारे दाखले, प्रमाणपत्रे याविषयी प्रलंबित अर्ज निकाली काढणे, प्रमाणपत्र, दाखल्यांविषयीची माहिती, आवश्यक असलेल्या कागदपत्रांची माहितीपत्रक प्रसिद्ध करणे; ३ ऑगस्ट या दिवशी ‘एक हात मदतीचा’ यात हानीविषयी पात्र नागरिकांना लाभ देण्याविषयीची कार्यवाही करणे; ४ ऑगस्ट या दिवशी जनसंवादमध्ये महसूल अदालतीचे आयोजन करून प्रलंबित असलेली प्रकरणे निकाली काढणे; ५ ऑगस्ट या दिवशी ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ अंतर्गत जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी किंवा समादेशक अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेल्या अर्जांवर कार्यवाही करणे; ६ ऑगस्ट या दिवशी महसूल संवर्गातील जिल्ह्यात कार्यरत असलेल्या, सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी, कर्मचारी यांच्या प्रलंबित सेवाविषयक गोष्टी निकाली काढणे आणि ७ ऑगस्ट या दिवशी महसूल सप्ताह सांगता समारंभात सप्ताहातील विविध उपक्रमांविषयीची फलनिष्पत्ती, विशेष उल्लेखनीय कामकाजाची नोंद घेऊन सांगता समारंभ आयोजित करणे.