यापुढील काळात काँग्रेसला ‘जशास-तसे’ उत्तर दिले जाणार असल्याची चेतावणी !
कोल्हापूर – काँग्रेस पक्ष, डावे, तसेच अन्यांकडून ऋषितुल्य असलेल्या पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्यावर अकारण आरोप केले जात आहेत. मूठभर लोकच गुरुजींच्या विरोधात असून सकल हिंदु समाज पू. भिडेगुरुजी यांच्या पाठीशी आहे, हे सांगण्यासाठी सकल हिंदु समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पू. भिडेगुरुजी यांना समर्थन करणारे आंदोलन करण्यात आले. ‘काँग्रेसला यापुढील काळात जशास तसे उत्तर दिले जाईल’, अशी चेतावणी देण्यात आली. या प्रसंगी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, बजरंग दल, शिवसेना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदु एकता आंदोलन, हिंदु महासभा यांच्यासह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी आणि धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा कार्यवाह श्री. सुरेश यादव म्हणाले, ‘‘पू. भिडेगुरुजी यांच्या पाठीशी सकल हिंदु समाज आहे. काँग्रेसने पू. भिडेगुरुजी यांच्या संदर्भात जर अयोग्य शब्दांचा वापर केला, तर ‘जशास तसे’ प्रत्त्युत्तर देण्यात येईल.’’
या प्रसंगी धारकरी अभिनंदन सोळांकुरे म्हणाले, ‘‘पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी गांधीजींची अपकीर्ती केली, असा आरोप काँग्रेस करत आहे; मात्र वस्तूत: ही माहिती अमिताव घोष यांनी लिहिलेल्या ‘द कुराण अँड द काफीर’ या पुस्तकाच्या आधारे दिली आहे. हे पुस्तक वर्ष १९८३ मध्ये प्रकाशित झाले आहे. अमिताव घोष यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेचे १६ वे गव्हर्नर म्हणून काम केले आहे. १९२ पानांच्या या पुस्तकात १०६ क्रमांकाच्या पानावर गांधींच्या जन्माच्या संदर्भातील उल्लेख आहे.’’
शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे म्हणाले, ‘‘द कुराण अँड द काफीर’ या पुस्तकात जी माहिती देण्यात आली आहे, त्या पुस्तकावर आजपर्यंत बंदी आलेली नाही, त्यामुळे आपण हाही प्रश्न विचारला पाहिजे की, ही माहिती जर खोटी असेल, तर आजपर्यंत या पुस्तकावर कारवाई का झाली नाही ?’’
या प्रसंगी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे शहर कार्यवाह श्री. आशिष लोखंडे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, सेवाव्रत प्रतिष्ठानचे श्री. संभाजी साळुंखे यांसह अन्य मान्यवरांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. या वेळी बजरंग दलाचे श्री. अक्षय ओतारी, उद्धव ठाकरे गटाचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. मनोहर सोरप, हिंदु एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, शहरप्रमुख श्री. गजानन तोडकर, शिवसेनेचे श्री. उदय भोसले, भ्रष्टाचारविरोधी जनजागृती समितीचे प्रांत उपाध्यक्ष श्री. आनंदराव पवळ, सर्वश्री गणेश जाधव, रोहित अतिग्रे, अर्जुन चौगुले, नितीन चव्हाण, विजय गुळवे, प्रकाश संकपाळ, अनिकेत पाटील, अभिषेक खडके, आशिष पाटील, नीलेश पाटील, शिवाजीराव मोटे, प्रथमेश मोरे, आदित्य जासूद, संजय जासूद, राजू गडकरी यांसह अन्य उपस्थित होते.
क्षणचित्रे
१. या प्रसंगी धारकर्यांनी ‘द कुराण अँड द काफीर’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ हातात धरले होते.
२. युवकांची उपस्थिती लक्षणीय होती. भगवे ध्वज-टोप्या यांमुळे वातावरणात वीरश्री होती.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे काँग्रेसला प्रश्न१. आमदार अबू आझमी यांनी विधानसभेत ‘वन्दे मातरम्’ म्हणणार नाही’, असे सांगितल्यावर विरोध का केला नाही ? २. गांधींच्या विरोधात विधाने करणार्या वामन मेश्राम यांच्या विरोधात काँग्रेसने आजपर्यंत कारवाईची मागणी का केली नाही ? ३. नुकतेच पुणे येथे जे आतंकवादी सापडले आहेत त्यांचा आणि कोल्हापूरच्या जंगलात आतंकवाद्यांनी बाँबस्फोटाच्या ज्या चाचण्या केल्या, त्यांचा काँग्रेसने का निषेध केला नाही ? |
सांगली येथेही श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या प्रतिमेला शिवतीर्थावर दुग्धाभिषेक करण्यात आला. |