श्रीकृष्णजन्मभूमीचे सर्व खटले मथुरेतील न्यायालयातच चालवण्यासाठी मुसलमान पक्षाची सर्वोच्च न्यायालयात याचिका

श्रीकृष्णजन्मभूमीच्या प्रकरणातील सर्व खटले अलाहाबाद उच्च न्यायालयात चालवले जावेत, या निर्णयाच्या विरोधात मुसलमान पक्षाने सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे.

नेपाळमध्ये ५ परदेशी नागरिक असलेले हेलिकॉप्टर बेपत्ता

नेपाळमधील माऊंट एव्हरेस्ट पर्वताजवळ एक हेलिकॉप्टर बेपत्ता झाले. हेलिकॉप्टरने सकाळी सवादहा वाजता उड्डाण केल्यानंतर पुढील १० मिनिटानंतर त्याचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. या हेलिकॉप्टरमध्ये वैमानिक आणि ५ विदेशी नागरिक होते.

देहलीत चुकीच्या दिशेने जाणार्‍या शाळेच्या बसच्या धडकेत ६ जणांचा मृत्यू

नवी देहली येथील मेरठ महामार्गावर एक मार्गी रस्त्यावर विरुद्ध दिशेने आलेल्या शाळेच्या बसने एका चारचाकी गाडीला धडक दिल्याने या गाडीतील ६ जणांचा मृत्यू झाला, तर दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. मृतांमध्ये २ लहान मुले, २ महिला आणि २ पुरुष यांचा समावेश आहे.

देहली दंगलीत पोलीस हवालदाराची हत्या करणार्‍या महमंद खालिद याला मणीपूरमध्ये अटक !

अशांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक आहे !

 तरुणीच्या कमरेवर हात ठेवून नृत्य करणार्‍या पाद्रयाचा व्हिडिओ प्रसारित करणार्‍या हिंदु तरुणाला अटक

पाद्रयांचे खरे स्वरूप विदेशातील जनतेला ठाऊक झाल्यामुळेच तेथील चर्च ओस पडू लागले आहेत. सहस्रो ख्रिस्ती नास्तिक होऊ लागले आहेत. या वस्तूस्थितीकडे केवळ मतांच्या राजकारणासाठी दुर्लक्ष करणारे द्रमुक सारखे राजकीय पक्ष हिंदु राष्ट्र अपरिहार्य करतात !

श्रीकृष्णजन्मभूमीवरील ईदगाह मशिदीचे वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याची मागणी करणारी याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळली

श्रीकृष्णजन्मभूमीला शाही ईदगाह मशिदीच्या ठिकाणी पुनर्स्थापित करण्याची मागणी करण्यात आली आहे.

(म्हणे) ‘प्रतिदिन लोक नदी किंवा तलाव येथे बुडून मरत असतात !’ – महादेव सिंह खंडेला, आमदार, अपक्ष

अशा आमदारांची आमदारकी रहित करण्याची मागणी जनतेने सरकारकडे केली पाहिजे !

साधू-संतांनी नेहमीच राजकारणापासून दूर राहिले पाहिजे ! – पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री

साधू-संतांनी राजकारणाकडे पाहूही नये. साधू-संतांना राजकारणापासून नेहमीच दूर राहिले पाहिजे. राजकारणात आल्याने मर्यादा येतात. साधूंना त्याचा प्रवास अमर्याद ठेवण्याची आवश्यकता आहे, असे विधान बागेश्‍वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी ‘झी न्यूज’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिले.

उत्तरप्रदेशात धर्मांतराचे षड्यंत्र उघड : गाझियाबाद पोलिसांकडून ३ धर्मांधांना अटक

धर्मांधांचे असे धाडस होऊ नये, असा वचक सरकारने निर्माण करणे आवश्यक आहे !

(म्हणे) ‘महानगरपालिकेची अनुमती घेतली आहे का ?’ – बेंगळुरू पोलीस

बेंगळुरू येथील पुरातन नागकट्ट्याजवळील नागदेवतेची पूजा करण्यास पोलिसांकडून आडकाठी !