नवी देहली – देहलीत वर्ष २०२० मध्ये धर्मांध मुसलमानांनी केलेल्या दंगलीमध्ये पोलीस हवालदार रतन लाल यांची अमानुषरित्या हत्या करण्यात आली होती. या प्रकणातील मुख्य आरोपी महंमद खालिद याला मणीपूर येथील म्यानमारच्या सीमेवरून आता अटक करण्यात आली आहे. खालिदची माहिती देणार्याला पोलिसांकडून १ लाख रुपयांचे बक्षिसही घोषित करण्यात आले होते.
The police have arrested a man in connection with the murder of a head constable, Ratan Lal, during the 2020 north-east Delhi riots.https://t.co/22XPqEx5iw
— The Hindu – Delhi (@THNewDelhi) July 11, 2023
खालिद याच्या चौकशीत त्याने ‘या दंगलीपूर्वी त्याच्या घरी एक गुप्त बैठक झाली होती. यात मुसलमानांनी घरामध्ये लोखंडी सळ्या आदी शस्त्र ठेवण्याचे ठरवण्यात आले होते’, याची स्वीकृती दिली. खालिदचा भाऊ अयाझ यालाही गेल्या मासातच या दंगलीच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. या दंगलीत ५० जण ठार झाले होते, तर शेकडो लोक घायाळ झाली होती, तसेच कोट्यवधी रुपयांची हानी झाली होती.
संपादकीय भूमिकाअशांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक आहे ! |