प्रयागराज (उत्तरप्रदेश) – ईदशाह मशीद व्यवस्थापन समिती आणि उत्तरप्रदेश सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्ड यांनी श्रीकृष्णजन्मभूमीच्या खटल्यावर घेतलेल्या आक्षेपांवर निर्णय घेण्यापूर्वी मथुरेतील दिवाणी न्यायालयाला श्रीकृष्णजन्मभूमीवरील ईदगाह मशिदीचे वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याच्या याचिकेवर निर्णय घेण्याचा आदेश देण्यात यावा, अशी मागणी करणारी हिंदु पक्षाची याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळून लावली.
शाही ईदगाह का नहीं होगा वैज्ञानिक परीक्षण, हाईकोर्ट ने सुनाया अहम फैसला#ShahiEidgahhttps://t.co/JTNnN7q6K0
— Zee Salaam (@zeesalaamtweet) July 11, 2023
जानेवारी २०२३ मध्ये मथुरेतील दिवाणी न्यायालयामध्ये याचिका प्रविष्ट करून श्रीकृष्णजन्मभूमीला शाही ईदगाह मशिदीच्या ठिकाणी पुनर्स्थापित करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्याला शाही ईदशाह मशीद व्यवस्थापन समिती आणि उत्तरप्रदेश सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्ड यांनी उच्च न्यायालयात आक्षेप घेतला आहे.