बलुचिस्तानमध्ये आतंकवाद्यांच्या आक्रमणात पाकचे ७ सैनिक ठार 

पाकने आतंकवाद पोसला. तो आता त्याच्यावर उलटला आहे, हे या आतंकवादी आक्रमणातून दिसून येते !

नाशिक येथील श्री सप्तशृंगीदेवीच्या दर्शनाला जाणार्‍या महिला भाविकांच्या दागिन्यांची चोरी !

चोरांच्या टोळीकडून महिलांच्या अंगावरील दागिन्यांची चोरी करणार्‍या चोरट्या महिलांना पोलीस का पकडत नाहीत ? पोलीस झोपले आहेत का ?

येत्या ८ दिवसांत एस्.टी. महामंडळाच्या ताफ्यात येणार ५० इलेक्ट्रिक शिवाई बस !

इंधनावरील खर्च आणि प्रदूषण अल्प करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये इलेक्ट्रिक गाड्यांना केंद्र सरकार प्रोत्साहन देत आहे. त्याअंतर्गत लवकरच एस्.टी. महामंडळाच्या ताफ्यात ५० इलेक्ट्रिक शिवाई बस दाखल होणार आहेत.

‘दत्त’ शब्द सार्थ ठरवला ! – उदय देशपांडे

अष्टांग योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांच्या १०४ व्या जन्मोत्सवानिमित्त शेवगावच्या गुरुदत्त सामाजिक संस्थेच्या वतीने प्रतिवर्षी दिल्या जाणार्‍या राज्यस्तरीय आध्यात्मिक आणि सामाजिक कार्य गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात श्री. देशपांडे बोलत होते.

अकोला येथे आक्षेपार्ह पोस्टवरून धर्मांधांकडून दंगल : १ जण ठार

धर्मांधांच्या श्रद्धास्थानांचा कुणी अवमान केला की, ते थेट कायदा हातात घेतात आणि हिंसाचार करतात, तसेच अवमान करणार्‍याचा शिरच्छेदही करतात, हे लक्षात घ्या !

कर्नाटकचे पोलीस महासंचालक प्रवीण सूद सीबीआयचे नवे महासंचालक ! 

केंद्रीय अन्वेषण विभागाचे म्हणजे सीबीआयचे नवे महासंचालक म्हणून कर्नाटकचे पोलीस महासंचालक प्रवीण सूद यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कृत्रिम बुद्धीमत्ता शेवटी कृत्रिमच !

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ (एआय) म्हणजे कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर आणि तिचे भविष्य यांविषयी विविध स्वरूपाच्या चर्चा चालू आहेत. नोव्हेंबर २०२२ मध्ये अस्तित्वात आलेल्या ‘चॅट जीपीटी’ तंत्रज्ञानाने इंटरनेट विश्‍वाला हादरा दिला. या तंत्रज्ञानाची ४ थी आवृत्ती (व्हर्जन) आली असून आणखी हादरे देण्यास ते सज्ज झाले आहे.

कोल्हापूर येथील पंचगंगेमध्ये ४ महिलांना बुडतांना जीवरक्षकांनी वाचवले  !

मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातून श्री करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्या ४ महिला पंचगंगेत बुडत असतांना जीवरक्षकांनी सतर्कतेने वाचवल्याने अनर्थ टळला.

दुर्गावाहिनीच्या ‘दुर्गा’ या शक्तीचे रूप ! – ह.भ.प. भास्कर गिरी महाराज

ज्ञानेश्वर माऊली यांच्या पद स्पर्शाने पवित्र झालेल्या त्रिमूर्ती स्कुल, नेवासा फाटा येथे ‘दुर्गावाहिनी पश्चिम महाराष्ट्र प्रदेश शौर्य प्रशिक्षणवर्गा’चे उद्घाटन ह.भ.प. भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.

योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांनी समाजातील वंचित घटकांसाठी काम केले ! – विलास पुजारी, पोलीस निरीक्षक

प.पू. दादाजी वैशंपायन यांच्या पुण्यतिथीनिमित्त येथील श्रीदत्त देवस्थानच्या दादाजी प्रसादालयात शहर आणि परिसरातील १०० गरीब अन् गरजू कुटुंबांना किराणा साहित्याचे विनामूल्य वाटप करण्याच्या कार्यक्रमप्रसंगी पुजारी बोलत होते.