अकोला येथे आक्षेपार्ह पोस्टवरून धर्मांधांकडून दंगल : १ जण ठार

अकोला – ‘फेसबूक’ या सामाजिक माध्यमावर एका व्यक्तीने महंमद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने १३ मेच्या रात्री शहरातील जुने शहर भागातील हरिहरपेठ येथे २ गटांत मोठी दंगल झाली. या दंगलीत विलास गायकवाड नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर २ पोलिसांसह १० हून अधिक जण घायाळ झाले आहेत. रामदासपेठ पोलिसांनी पोस्ट करणार्‍या व्यक्तीवर गुन्हा नोंद केला आहे. या दंगलीत दुचाकी, चारचाकी आणि अग्नीशमन दलाच्या २ गाड्या यांची प्रचंड तोडफोड अन् जाळपोळ करण्यात आली. जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी शहरात कलम १४४ (जमावबंदी) लागू करण्याचा आदेश दिला आहे, तसेच या प्रकरणी आतापर्यंत १२० जणांवर गुन्हे नोंद करण्यात आले असून २५ जणांना अटक करण्यात आली आहे. येथे दक्षतेचा उपाय म्हणून राज्य राखीव दलाच्या २ तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत. संवेदनशील भागात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. वाशिम गावातून अतिरिक्त कुमकही मागवण्यात आली आहे. सध्या शहरातील परिस्थिती नियंत्रणात असली, तरी शहरात तणावपूर्ण शांतता आहे.

१. हरिहरपेठ भागातील राजराजेश्वर सेतू येथे शहरातील एका भागांतून एक मोठा समूह चालून आला. या समूहाने संपूर्ण भागात दगडफेक आणि जाळपोळ करत दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. काही घरेही पेटवण्याचा प्रयत्न जमावाकडून करण्यात आला.

२. या दंगलीविषयी येथील पोलीस अधीक्षक संदीप घुगे म्हणाले की, रात्री शहरात धार्मिक तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू असतांना शहराच्या काही भागांत अचानक दगडफेक चालू झाली. दंगलखोरांनी वाहनांची हानी केली, तर काही ठिकाणी जाळपोळ झाली. त्याच वेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रित आणण्याचा प्रयत्न केला. शहरात आवश्यक त्या ठिकाणी पुरेसा बंदोबस्त ठेवून गस्त घातली जात आहे. परिस्थिती नियंत्रित आणण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. आम्ही नागरिकांना आवाहन करतो की, त्यांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये आणि पोलिसांना सहकार्य करावे, तसेच कुठेही गर्दी करू नये. नागरिकांना यासंबंधीची कोणतीही माहिती असेल, तर त्यांनी ती पोलिसांना द्यावी आणि आम्हाला सहकार्य करावे.

संपादकीय भूमिका 

  • धर्मांधांच्या श्रद्धास्थानांचा कुणी अवमान केला की, ते थेट कायदा हातात घेतात आणि हिंसाचार करतात, तसेच अवमान करणार्‍याचा शिरच्छेदही करतात, हे लक्षात घ्या !
  • महाराष्ट्रात गेल्या काही मासांत सातत्याने धर्मांधांकडून दंगली होणे, हे पोलिसांचा वचक अल्प असल्याचेच दर्शक आहे ! उत्तरप्रदेश जसा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दंगलमुक्त केला आहे, तसा महाराष्ट्रही होणे हिंदूंना अपेक्षित आहे !