येत्या ८ दिवसांत एस्.टी. महामंडळाच्या ताफ्यात येणार ५० इलेक्ट्रिक शिवाई बस !

एस्.टी. महामंडळाच्या ताफ्यात दाखल होत असलेली इलेक्ट्रिक शिवाई बस !

कोल्हापूर – इंधनावरील खर्च आणि प्रदूषण अल्प करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये इलेक्ट्रिक गाड्यांना केंद्र सरकार प्रोत्साहन देत आहे. त्याअंतर्गत लवकरच एस्.टी. महामंडळाच्या ताफ्यात ५० इलेक्ट्रिक शिवाई बस दाखल होणार आहेत. ५० पैकी निम्म्याहून अधिक बस एकट्या पुण्याला मिळणार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने पुणे-कोल्हापूर, पुणे-छत्रपती संभाजीनगर, पुणे-सोलापूर, पुणे-नाशिक या मार्गांवर ‘शिवाई’ बसगाड्या येत्या ८ दिवसांत धावणार आहेत. या पार्श्वभूमीवर स्वारगेट, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, कोल्हापूर येथील एस्.टी.च्या बसस्थानक परिसरात ‘चार्जिंग स्टेशन’ उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे.

एस्.टी.च्या ताफ्यात दाखल झालेल्या इलेक्ट्रिक बसच्या बॅटरीला ‘कॅट’ या नोंदणी संस्थेकडून नवीन कोड देण्याचे काम चालू आहे. यामुळे यंदाच्या उन्हाळी हंगामात राज्यातील प्रवाशांना प्रदूषणमुक्त शिवाईचा वातानुकूलीत प्रवास घडण्यास विलंब होत आहे; मात्र ही अडचण आता लवकरच दूर होत आहे, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.