पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्‍या हद्दीतील होर्डिंगची त्‍यांच्‍याकडे नोंदच नाही !

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांच्‍या हद्दीत अधिकृत आणि अनधिकृत होर्डिंग( संग्रहीत छायाचित्र )

पुणे – पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांच्‍या हद्दीत अधिकृत आणि अनधिकृत होर्डिंगची संख्‍या मोठी आहे; मात्र पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे त्‍यांच्‍या हद्दीतील एकाही होर्डिंगची नोंद नाही. स्‍थापना होऊन ७ वर्षे उलटली, तरी होर्डिंगला अनुमती देणार्‍या आणि त्‍यांच्‍याकडून शुल्‍क वसुली करणारा ‘आकाशचिन्‍ह’ विभागही पी.एम्.आर्.डी.ए.ने स्‍थापलेला नाही, त्‍यामुळे राष्‍ट्रीय महामार्गासह राज्‍य महामार्ग, महत्त्वाची ऐतिहासिक आणि धार्मिक ठिकाणे असलेल्‍या प्राधिकरणाच्‍या हद्दीतील होर्डिंगवर कुणाचेही नियंत्रण नाही.

काही दिवसांपूर्वी होर्डिंग पडून दुर्घटना झालेली

काही दिवसांपूर्वी होर्डिंग पडून दुर्घटना झाली. या पार्श्‍वभूमीवर पी.एम्.आर्.डी.ए.च्‍या हद्दीतील होर्डिंगची माहिती घेतल्‍यावर पी.एम्.आर्.डी.ए.च्‍या हद्दीतील होर्डिंग कुणाच्‍या अनुमतीने उभारली ? उभारण्‍यासाठी नियमांचे पालन केले आहे का ? त्‍याचे शुल्‍क भरले का ? होर्डिंग उभारतांना सुरक्षिततेचे निकष पाळले गेले आहेत का ?, तसेच हद्दीत किती अधिकृत आणि अनधिकृत होर्डिंग आहेत याची माहिती उपलब्‍ध नाही.

प्राधिकरण समितीने अनुमती देऊनही पी.एम्.आर्.डी.ए.ने आकाशचिन्‍ह विभाग, तसेच होर्डिंगच्‍या धोरणांच्‍या संदर्भात कोणतीही प्रक्रिया पूर्ण केली नाही. पी.एम्.आर्.डी.ए.कडे सध्‍या मनुष्‍यबळाची कमतरता असली, तरी आकाशचिन्‍ह विभाग चालू करणे, तसेच नव्‍याने होर्डिंग नियमावली सिद्ध करण्‍याचे काम चालू आहे. हद्दीतील होर्डिंगचे सर्वेक्षणही करण्‍यात येणार आहे, अशी माहिती पी.एम्.आर्.डी.ए.चे अतिरिक्‍त महानगर आयुक्‍त दीपक सिंगला यांनी दिली.

संपादकीय भूमिका

७ वर्षे उलटूनही महत्त्वाचे विभाग नसणारा पी.एम्.आर्.डी.ए. विकास कसा साधणार ?