सिंचन घोटाळ्यातील आरोपी अधिकार्‍यांना पदोन्नती देण्याचे ‘मॅट’चे निर्देश !

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि सुनील तटकरे यांची नावे आलेल्या ७१ सहस्र कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्यातील आरोपी अधिकार्‍यांना पदोन्नती देण्याचे निर्देश ‘महाराष्ट्र प्रशासकीय लवाद’ (मॅट) कडून देण्यात आले आहेत. या प्रकरणी महाराष्ट्र प्रशासकीय लवादाने राज्यशासनाला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले होते; मात्र सरकारने कोणतीही भूमिका सादर न केल्यामुळे महाराष्ट्र प्रशासकीय लवादाने आरोपींच्या बाजूने एकतर्फी निकाल दिला. (राज्य प्रशासनाने बाजू न मांडणे, हे भ्रष्टाचाराला खतपाणी घातले आहे, असे वाटल्यास आश्चर्य ते काय ? – संपादक) यामुळे दोन्ही आरोपी अधीक्षक अभियंत्यांची मुख्य अभियंतापदी बढती होऊ शकणार आहे.