मिरज येथे श्री संत वेणास्वामी पुण्यस्मरण महोत्सवाची सांगता !

संत वेणास्वामी मठ येथे साकडे घालतांना 1. समर्थभक्त श्री. मिलिंद कुलकर्णी, 2. पू. कौस्तुभबुवा रामदासी, तसेच उपस्थित भाविक

मिरज – येथील श्री संत वेणास्वामी मठामध्ये ८ एप्रिलपासून चालू झालेल्या कीर्तन महोत्सवाची सांगता मठाधिपती पू. कौस्तुभबुवा रामदासी यांच्या रसाळ कीर्तनाने झाली. कीर्तनाच्या पूर्व रंगांमध्ये बुवांनी सद्गुरूंचा महिमा सांगून ‘सत्याचे गुह्य स्वरूप उघडून दाखवतात ते सद्गुरु’, असे सांगून ‘गुरु शिष्याचा अज्ञानरूपी अंध:कार दूर करून त्याला अक्षयपदी बसवतात’, असे सांगितले. भारतातील पहिली महिला कीर्तनकार असा गौरव वेणास्वामींचा होती. वर्ष १६५५ मध्ये समर्थांनी मिरज येथे मठाची स्थापना करून त्याचे दायित्व संत वेणास्वामी यांना दिले.

या प्रसंगी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवानिमित्त समर्थभक्त श्री. मिलिंद कुलकर्णी यांनी साकडे घातले, तसेच हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा सर्वांकडून म्हणून घेतली.