रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई !

रत्नागिरी, २० एप्रिल (वार्ता.) – तालुक्यातील खेडशी मंडल अधिकारी अमित जगन्नाथ चिपरीकर (वय ३९ वर्षे) याला ३१ सहस्र रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरीच्या पथकाने १९ एप्रिल या दिवशी सापळा रचून पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, चिपरीकर याने एका व्यक्तीच्या नावावर असलेल्या सातबारा उतार्यावर दुरुस्ती करण्याकरता १० सहस्र रुपये, तर अन्य एकदाने खरेदी केलेल्या भूखंडाच्या सातबारा उतार्यावर करण्यात आलेल्या फेरफार नोंदीला संमती देण्याकरता २१ सहस्र रुपये, असे एकूण ३१ सहस्र रुपयांची लाच मागितली. (सरकारने भ्रष्टाचार्यांना तात्काळ कठोर शिक्षा केल्यासच भ्रष्टाचार्यांवर वचक बसेल ! – संपादक)
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे रत्नागिरी पोलीस उपअधीक्षक सुशांत चव्हाण आणि अन्य पोलीस कर्मचारी सहभागी असलेल्या पथकाने केली.
संपादकीय भूमिकातालुका स्तरापासून भ्रष्टाचार संपवण्यासाठी कठोर प्रयत्न केल्यासच भारत ‘भ्रष्टाचारमुक्त’ होईल ! |
खांदेश्वर येथे रखडलेल्या कामांना गती देणार असल्याचे महापालिकेचे आश्वासन !
इगतपुरीतील धरणाजवळ पर्यटकांवर आक्रमण करणार्या ९ स्थानिक गुंडांना अटक !
वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !