राष्ट्राभिमान, सेवेची तळमळ आणि इतरांना साहाय्य करणारे सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमातील श्री. सागर निंबाळकर (वय ४४ वर्षे) !

१.४.२०२३ या दिवशी सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात पूर्णवेळ साधना करणारे श्री. सागर निंबाळकर यांचा ४४ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांची पत्नी सौ. श्रद्धा निंबाळकर यांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

श्रीरामभक्त लक्ष्मणाची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !

रामभक्त लक्ष्मणामध्ये अनेक दैवी गुणांचा समुच्चय होता. व्यष्टी आणि समष्टी अशा दोन्ही स्तरांवर लक्ष्मणाने सर्व कर्तव्ये पूर्ण करून आदर्श पुत्र, आदर्श बंधू आणि आदर्श सेवक या सर्वांची कर्तव्ये पूर्ण करून सर्वांपुढे आदर्श भक्ताचे उदाहरण ठेवले आहे.

सातत्य आणि स्वतःच्या चुकांविषयी गांभीर्य असलेले रामनाथी, गोवा येथील सनातनच्या रामनाथी आश्रमातील श्री. पुंडलीक माळी (वय ६८ वर्षे) !

‘चैत्र शुक्ल नवमी (रामनवमी), ३०.३.२०२३ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील श्री. पुंडलीक माळी यांचा ६८ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त मला बाबांकडून शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.

साधकांनो, ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार साधना केल्याने आध्यात्मिक प्रगती होणारच आहे !’

सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने आतापर्यंत (२५ मार्च २०२३ पर्यंत) सनातनचे १०८७ साधक ६० टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाले आहेत आणि १२३ साधक संत झाले आहेत !

५२ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली मडगाव, गोवा येथील कु. श्रद्धा महादेव रसाळ (वय ८ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. श्रद्धा महादेव रसाळ ही या पिढीतील एक आहे !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवा आणि नामजप करतांना साधिकेला फुले अन् अत्तर यांचा सुगंध येणे

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवा आणि नामजपादी उपाय करतांना अन् अन्य ठिकाणीही मला वेगवेगळ्या फुलांचा सुगंध येत असे. प्रत्येक वेळी मला १ किंवा २ प्रकारच्या फुलांचा सुगंध यायचा.

आजीच्‍या निधनाच्‍या वेळी मनाची झालेली विचारप्रक्रिया आणि परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांची अनुभवलेली कृपा !

२.८.२०२२ या दिवशी रात्री आजीची प्रकृती अधिकच खालावली. आजीला रक्‍तदाब आणि डोकेदुखी यांचा त्रास होता.