चंद्रपूर येथे चंदनाची १ सहस्र झाडे जळून खाक !

२० लाख रुपयांची हानी

चंद्रपूर – जिल्ह्यातील मांगली देवतळे येथील एका शेतकर्‍याच्या शेतातील चंदनाची  १ सहस्र झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. जयंत नौकरकार असे शेतकर्‍याचे नाव आहे. दुपारच्या वेळेत अचानक आग लागून ही सर्व झाडे आणि ठिबक सिंचन यंत्रणा जळून खाक झाली आहे. आगीत शेतकर्‍याची २० लाख रुपयांची हानी झाली आहे.