रा.स्व. संघाची तुलना कौरवांशी केल्यावरून राहुल गांधी यांच्या विरोधात याचिका

पाटलीपुत्र (बिहार) – राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना कौरवांशी केल्याच्या प्रकरणी त्यांच्या विरोधात हरिद्वार येथील द्वितीय न्यायदंडाधिकारी यांच्याकडे याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. (निव्वळ हिंदुद्वेषापायी भारतातील सर्वांत मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटनेवर अश्लाघ्य टीका करणारे हिंदुद्वेषी राहुल गांधी ! प्रथम स्वातंत्र्यवीर सावरकर आणि आता हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्यावर टीका करणार्‍या राहुल गांधी यांच्यावर कारवाई होण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक ! – संपादक)

यावर १२ एप्रिलला सुनावणी होणार आहे. कमल भदौरिया यांनी ही तक्रार केली आहे. यापूर्वी राहुल गांधी यांना ‘मोदी’ आडनावाची मानहानी केल्याच्या प्रकरणी सुरत सत्र न्यायालयाने २ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.