रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात आल्‍यावर पुणे येथील सौ. शीतल स्‍वामी यांना आलेल्‍या अनुभूती

मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात येण्‍यासाठी निघतांना आमची कुलदेवी बदामी (कर्नाटक) येथील श्री विद्याचौडेश्‍वरीदेवी (श्री बनशंकरीदेवी) हिला प्रार्थना केली, ‘हे माते, रामनाथी आश्रम भूतलावरील वैकुंठ आहे. तेथे देवीदेवतांचा सतत वास असतो. ‘चैतन्‍याने भारित झालेल्‍या या आश्रमात मला तुझे दर्शन व्‍हावे’, अशी माझी इच्‍छा आहे.

ठाणे जिल्‍ह्यातील श्री मलंगगडाच्‍या पायथ्‍याशी ५ मार्चला श्री मलंगजागरण सभेचे आयोजन !

या सभेला उपस्‍थित राहून प्रत्‍येकाने आपले धर्मकर्तव्‍य बजावावे, असे आवाहन सकल हिंदु समाजच्‍या वतीने करण्‍यात आले आहे.

तेलशुद्धीकरण प्रकल्‍पाच्‍या नियोजित ठिकाणी आमदार आणि प्रशासकीय अधिकारी यांच्‍याकडून भूमीची खरेदी ! 

सरकारकडून अधिक पटीने पैसा मिळावा, यासाठी अनिलकुमार गायकवाड या सरकारी अधिकार्‍याची तेलशुद्धीकरण प्रकल्‍पाच्‍या नियोजित ठिकाणी सहस्रो एकर भूमी आहे.

आमदार टी. राजासिंह यांच्‍या विरोधात लातूर येथे गुन्‍हा नोंद !

शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे आमदार टी. राजासिंह यांच्‍या विरोधात २८ फेब्रुवारीच्‍या पहाटे गुन्‍हा नोंद करण्‍यात आला. १९ फेब्रुवारी या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या जयंतीच्‍या निमित्ताने दुचाकी फेरी काढण्‍यात आली होती.

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने नागपूर येथे मंदिर विश्‍वस्‍तांच्‍या भव्‍य अधिवेशनाचे आयोजन !

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने येथील तात्‍या टोपे नगरच्‍या श्री गणेश मंदिरात नागपूरमधील मुख्‍य मंदिरांच्‍या विश्‍वस्‍तांची दुसरी बैठक पार पडली. या बैठकीत नागपूरमध्‍ये मंदिर विश्‍वस्‍तांचे भव्‍य अधिवेशन आयोजित करण्‍याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्‍यात आला.

हिंदूंवर अन्‍याय करणार्‍या ‘वक्‍फ’ कायद्यांसारखे अन्‍य सर्व कायदे रहित करा ! – आनंदराव काशीद

‘वक्‍फ बोर्डा’ला अमर्याद अधिकार देऊन हिंदूंची भूमी बळकवायला  देणार्‍या वक्‍फ कायद्यांसारखे हिंदूंवर अन्‍याय करणारे सर्व कायदे सरकारने रहित करावेत. आपले श्रद्धास्‍थान असलेल्‍या गडदुर्गांवर अतिक्रमण चालू असून हिंदूंच्‍या देवस्‍थानांच्‍या भूमीवर अतिक्रमण होत आहे.

महाराष्‍ट्रातील अंगणवाडी सेविकांच्‍या मानधनात १ सहस्र ५०० रुपयांची वाढ ! – राज्‍यशासनाचा निर्णय

राज्‍यातील अंगणवाडी सेविकांच्‍या मागण्‍या राज्‍यशासनाकडून मान्‍य करण्‍यात आल्‍या आहेत. अंगणवाडी सेविकांच्‍या मानधनात १ सहस्र ५०० रुपयांची वाढ करण्‍याचा निर्णय राज्‍यशासनाने घेतला आहे

राष्‍ट्रीय मानवी हक्‍क आयोगाकडून एस्.टी. कर्मचार्‍यांच्‍या तक्रारीची नोंद !

संपूर्ण महाराष्‍ट्रासह देशातील गुजरात, मध्‍यप्रदेश, कर्नाटक, गोवा, तेलंगाणा आणि आंध्रप्रदेश या ७ राज्‍यांतील प्रवाशांचा प्रवास सुखकर करणारे राज्‍य परिवहन (एस्.टी.) महामंडळाचे कर्मचारी मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत.

‘सामूहिक कॉपी’स साहाय्‍य करणार्‍या परीक्षा केंद्र संचालकांसह ९ शिक्षकांवर गुन्‍हा नोंद !

दौंड (पुणे) येथे इयत्ता १२ वीच्‍या परीक्षेतील अपप्रकार

वैज्ञानिक दृष्टीकोनांच्या कार्यक्रमांची अनुमती शिक्षणाधिकार्‍यांकडून रहित !

वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या गोंडस नावाखाली हिंदु धर्म, संत, परंपरा, श्रद्धास्थाने यांवर आघात करून विद्यार्थ्यांना नास्तिक बनवण्याचे प्रयत्न केले जात असल्याचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा इतिहास आहे.