पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांचे बनावट टि्‌वटर खाते बनवून भामट्याने पैसे उकळले !

पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील

मुंबई – महाराष्‍ट्रातील ‘लेडी सिंघम’ म्‍हणून ओळखल्‍या जाणार्‍या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्‍या नावाने टि्‌वटरवर बनावट खाते उघडल्‍याचा प्रकार समोर आला आहे. या बनावट खात्‍यावरून सायबर भामट्याने एका मुलीचे ‘लिव्‍हर ट्रान्‍सप्‍लांट’ केले असून उपचारासाठी पैशांची नितांत आवश्‍यकता असल्‍याची ‘पोस्‍ट’ टाकली. हे अकाऊंट मोक्षदा पाटील यांचे असल्‍याचा विश्‍वास ठेवून देशभरातील आय.पी.एस्. अधिकार्‍यांसह अनेकांनी पैसे पाठवले. पाटील यांना हे लक्षात येताच त्‍यांनी टि्‌वटरला हे खाते बंद करण्‍याविषयी कळवले.