सौ. मनीषा पाठक संत होण्यापूर्वी त्यांच्या सहवासात आलेल्या अनुभूती !

पू. (सौ.) मनीषा पाठक

१. सौ. प्रीती कुलकर्णी, कोथरूड, पुणे.

१ अ. जाणवलेले पालट

१. ‘जानेवारी २०२२ मध्ये मनीषाताई रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातून पुणे येथे आल्यावर मी त्यांना भेटले. तेव्हापासून त्यांच्या तोंडवळ्यावर पूर्वीपेक्षा अधिक तेज जाणवते. त्यांचा तोंडवळा निरागस बाळाप्रमाणे गोड आणि सुंदर वाटतो. ‘त्यांच्याकडे पहातच रहावे’, असे वाटते.

२. त्यांची त्वचा अधिक मऊ जाणवते.

१ आ. आलेल्या अनुभूती

१. मनीषाताईच्या वाणीतून साक्षात् प.पू. गुरुदेवांचे चैतन्य प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवते. ताई बोलत असतांना ‘ती बोलत नसून तिथे केवळ गुरुदेवच आहेत’, असे मला अनुभवता येते.

२. ‘ताई प.पू. गुरुदेवांशी एकरूप झाली आहे’, असे जाणवते.’

२. सौ. स्नेहल पाटील (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सिंहगड रस्ता, पुणे.

२ अ. आलेल्या अनुभूती

२ अ १. मनीषाताईंचे सत्संगातील बोलणे दैवी वाटणे आणि भावजागृती होणे : ‘मनीषाताई सत्संगात बोलत असतांना तिचा आवाज दैवी भासतो. तिचे शब्द अंतर्मनापर्यंत जातात आणि माझा भाव जागृत होतो.

२ अ २. एखाद्या प्रसंगावर मात करण्यासाठी माझा संघर्ष होत असतांना ताईंनी पूर्वी सांगितलेले दृष्टीकोन प्रत्यक्ष ऐकू येतात आणि त्या क्षणी प्रसंगावर मात करता येते.

२ अ ३. मनीषाताईंचे डोके आणि पाय दाबून देत असतांना ‘संतांचीच सेवा करत आहे’, असा भाव आपोआप निर्माण होणे अन् गुरुदेवांची पुष्कळ आठवण येणे : एकदा मनीषाताईंच्या डोक्यात आणि पायांत पुष्कळ वेदना होत होत्या. त्यांनी मला जोर देऊन डोके दाबायला सांगितले. डोके आणि पाय दाबून देतांना हलकेपणा जाणवत होता. त्या दिवशी माझी संगणकीय सेवा अधिक झाल्याने माझा हात दुखत होता; पण ताईंचे डोके दाबून दिल्यावर माझे हात दुखणे थांबले. पाय दाबतांना ‘मी संतसेवा करत आहे’, असा भाव आपोआप निर्माण झाला. मला गुरुदेवांची पुष्कळ आठवण होत होती.’

(लेखातील सूत्रांचा दिनांक : २१.८.२०२२)

(हे लिखाण पू. (सौ.) मनीषा पाठक संत होण्यापूर्वीचे असल्याने तेथे ‘पू.’ असा उल्लेख केलेला नाही.)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक