जळगाव येथे ‘व्यसनाची होळी’ उपक्रमाचे आयोजन !

प्रतिकात्मक छायाचित्र

जळगाव – होळीला ठिकठिकाणी विविध वृक्षांची केली जाणारी तोड रोखण्यात यावी, यासाठी वन्यजीव संरक्षण संस्थेने येथील विविध भागांमध्ये वृक्षतोड थांबवण्यासाठी पथके सिद्ध केली आहेत. ही पथके वृक्षतोड थांबवून कचरा आणि व्यसनाधीनता यांची होळी करण्यासाठी नागरिकांमध्ये जागृती करत आहेत. यामध्ये पालापाचोळा, गुटखा किंवा तंबाखू यांच्या पुड्या, मद्याच्या बाटल्या, त्यांची वेष्टने आदींची होळी करण्यात येणार आहे.

संपादकीय भूमिका 

  • ‘व्यसनाची होळी’ जागतिक व्यसनमुक्ती दिनाला का आयोजित केली जात नाही ? होळीच्याच दिवशी असे प्रकार का ? असे केल्यास या सणाला ‘होळी’ म्हणणे योग्य ठरेल का ?
  • कचरा जाळून प्रतिकात्मक होळी करणे अयोग्य ! होळी ही धार्मिक कृतींनुसारच व्हायला हवी.
  • ख्रिस्ती लोक ‘ख्रिसमस’साठी फांद्या तोडतात, मेणबत्त्या जाळतात, मुसलमान मजारीवर चादरी चढवतात, तेव्हा कुणीही आवाज का उठवत नाही ?