बांगलादेशातील ऑक्सिजन प्रकल्पातील भीषण स्फोटात ६ ठार; ३० घायाळ

बांगलादेश – येथील चित्तगावच्या सीताकुंडा परिसरात ४ मार्च या दिवशी दुपारी ऑक्सिजन प्रकल्पात भीषण स्फोट झाला. यात आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला असून ३० जण गंभीर घायाळ झाले आहेत. अपघातस्थळाच्या २.कि.मी. अंतरावरील इमारतींना यामुळे हादरा बसला आहे. सध्या अग्नीशमन दलाच्या जवानांकडून बचाव कार्य चालू आहे.