धर्म आणि राष्‍ट्र हानी रोखण्‍यासाठी जागृत करणारे ग्रंथ !

‘हिंदु राष्‍ट्र’ म्‍हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या ‘हिंदवी स्‍वराज्‍या’सारखे राज्‍य ! हिंदु राष्‍ट्रात भारताच्‍या अंतर्गत आणि बाह्य समस्‍या सुटतील ! लोकशाहीमुळे झालेली अधोगती रोखण्‍यासाठी ‘हिंदु राष्‍ट्रा’ची आवश्‍यकता सांगणारा आणि धर्माधिष्‍ठित व्‍यवस्‍थेचे महत्त्व विशद करणारा ग्रंथ !

गोवा नोंदणी (रजिस्‍ट्रेशन) कार्यप्रणालीमध्‍ये सुधारणांची आवश्‍यकता !

लोकप्रतिनिधींनी कायद्यात सुधारणा करून कार्यप्रणाली सोपी केली, तर ते नोंदणी कार्यालय, सरकार आणि जनता तिघांच्‍या हितातेच ठरेल. शेवटी सरकारला लवकर आणि अधिक प्रमाणात महसूल मिळेल आणि त्‍यांचे नोंदणी शुल्‍क अन् स्‍टँप अधिक प्रमाणात शासकीय कार्यालयात गोळा होईल.

चीनची ‘मल्‍टी डोमेन’ युद्ध करण्‍याची सिद्धता आणि भारताची क्षमता !

सर्व राजकीय पक्ष आणि भारतीय एकत्र आले अन् त्‍यांनी चिनी नागरिकांसारखे कष्‍ट घेऊन देशाचा आर्थिक विकास केला, तर भारताला संरक्षणाचे प्रावधान वाढवायला वेळ मिळेल आणि चीनच्‍या कुठल्‍याही प्रकारच्‍या युद्धाला प्रत्‍युत्तर देण्‍याची क्षमता वाढेल. त्‍यासाठी भारताने त्‍वरित संरक्षणाचे प्रावधान वाढवणे आवश्‍यक आहे.’

‘महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालया’ला चित्रीकरणासाठी लागणार्‍या साहित्‍याची आवश्‍यकता !

‘महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालया’ला चित्रीकरणासाठी लागणार्‍या साहित्‍याची आवश्‍यकता ! साहित्‍य खरेदी करण्‍यासाठी अर्पणदाते आपल्‍या क्षमतेनुसार शक्‍य होईल, तेवढे अर्पण करून या धर्मकार्यात योगदान देऊ शकतात.

‘स्‍वभावदोष आणि अहं यांच्‍या निर्मूलनाची प्रक्रिया, म्‍हणजे साधकांच्‍या आध्‍यात्मिक उन्‍नतीसाठी देवाने दिलेली संजीवनी आहे’, हे अनुभवणार्‍या ६३ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या सौ. अनुराधा निकम (वय ६४ वर्षे)!   

आपल्‍या चित्तावर योग्‍य संस्‍कार करून आपली व्‍यष्‍टी आणि समष्‍टी साधना चैतन्‍याच्‍या स्‍तरावर चालू करणारा चैतन्‍याचा झरा, म्‍हणजे स्‍वभावदोष अन् अहं यांच्‍या निर्मूलनाची प्रक्रिया !

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍यावर असलेल्‍या दृढ श्रद्धेच्‍या बळावर कर्करोग असल्‍याचे समजूनही स्‍थिर रहाणार्‍या ६० टक्‍के आध्‍यात्मिक पातळी असणार्‍या श्रीमती स्‍मिता नवलकर (वय ७१ वर्षे) !

आधुनिक वैद्यांनी मला मोठ्या आतड्याच्‍या एका भागाचा कर्करोग (Sigmoid Colon) झाल्‍याचे सांगितले.मी ‘माझ्‍यावर उपचार करणारे, ‘एंडोस्‍कोपी’ करणारे आणि पेटस्‍कॅन करणारे आधुनिक वैद्य यांच्‍या माध्‍यमातून गुरुदेवच माझी तपासणी करत आहेत’, असा भाव ठेवल्‍याने मला अल्‍प त्रास झाला.

परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे आज्ञापालन तळमळीने करणार्‍या पू. रेखा काणकोणकर !

‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी पू. रेखाताई यांना एका सत्‍संगात ‘पुढाकार घेणे आणि नेतृत्‍व घेऊन इतरांना घडवणे’, ही ध्‍येये दिली होती. त्‍यांच्‍यात हे दोन्‍ही गुण चांगल्‍या प्रकारे विकसित झाले आहेत.

परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी साधिकेला सर्वकाही शिकून घेण्‍यास सांगितल्‍यावर तिचे झालेले चिंतन आणि तिला शिकायला मिळालेली सूत्रे

जेव्‍हा गुरुदेवांनी मला ‘तुला सर्व शिकायचे आहे’, असे सांगितले, तेव्‍हा माझा विचार केवळ ‘सेवा आणि दायित्‍व घेणे’, या दृष्‍टीने झाला होता.

साधक स्‍वप्‍नांच्‍या माध्‍यमातून अनुभवत असलेली सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, सद़्‍गुरु आणि संत यांची कृपा !

‘वर्ष २०१४ पासून मी सनातनच्‍या मार्गदर्शनानुसार साधना करू लागलो. तेव्‍हा मला स्‍वप्‍नात ध्‍यानमग्‍न स्‍थितीतील परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन झाले. मला परात्‍पर गुरु डॉक्‍टरांचा चेहरा शिव शंकरासम भासला. ‘ते ‘श्री गुरुदेव दत्त ।’, हा नामजप करत आहेत’, असे मला दिसले.

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी कु. माधुरी दुसे हिच्‍या सेवेचे कौतुक केल्‍यावर तिने व्‍यक्‍त केलेली कृतज्ञता !

अपेक्षा अन् बहिर्मुखता यातून नेत आहात तुम्‍ही मला स्‍थिरतेकडे ।
आनंदाचा क्षण हा आज अनुभवला तुमच्‍या प्रीतीमुळे, प्रीतीमुळे ॥