१. पू. रेखा काणकोणकर यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे
अ. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पू. रेखाताई यांना एका सत्संगात ‘पुढाकार घेणे आणि नेतृत्व घेऊन इतरांना घडवणे’, ही ध्येये दिली होती. त्यांच्यात हे दोन्ही गुण चांगल्या प्रकारे विकसित झाले आहेत.
आ. पू. रेखाताई यांच्यातील भिडस्तपणा न्यून झाला आहे. त्या आता मोकळेपणाने संवाद साधतात.
इ. पू. रेखाताईंचा तोंडवळा उजळला आहे.
२. पू. रेखा काणकोणकर यांच्या सत्संगात आलेल्या अनुभूती
अ. पू. रेखाताई सभोवती असतांना त्यांच्यातील वात्सल्यभाव अनुभवता येतो.
आ. पू. ताईंपासून काही अंतरावर उभे असतांना माझी भावजागृती होते.
इ. त्या इतरांशी संवाद साधतांना किंवा मार्गदर्शन करतांना मन आपोआप कृतज्ञतेने भरून येते.’
– अधिवक्ता योगेश जलतारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.२.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |