पुणे – ५०० रुपयांच्या बनावट नोटा बाळगणार्या नीलेश वीरकर या चिंचवडमधील तरुणाला सहकारनगर पोलिसांनी अटक केली. तरुणाकडून २५० बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. त्याने बनावट नोटा कोठून आणल्या ? यादृष्टीने अन्वेषण चालू आहे. पुणे-सातारा रस्त्यावरील पद्मावती परिसरात सहकारनगर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार अमोल पवार, महेश मंडलिक गस्त घालत होते. त्या वेळी पी.एम्.पी. थांबा परिसरातून वीरकर जात असतांना पवार आणि मंडलिक यांना संशय आल्याने त्यांनी त्याला थांबवून चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. तेव्हा त्याची झडती घेतल्यावर त्याच्याकडे ५०० रुपयांच्या नोटा सापडल्या.