साधक स्‍वप्‍नांच्‍या माध्‍यमातून अनुभवत असलेली सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, सद़्‍गुरु आणि संत यांची कृपा !

श्री. अमित हावळ

१. ‘वर्ष २०१४ पासून मी सनातनच्‍या मार्गदर्शनानुसार साधना करू लागलो. तेव्‍हा मला स्‍वप्‍नात ध्‍यानमग्‍न स्‍थितीतील परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन झाले. मला परात्‍पर गुरु डॉक्‍टरांचा चेहरा शिव शंकरासम भासला. ‘ते ‘श्री गुरुदेव दत्त ।’, हा नामजप करत आहेत’, असे मला दिसले.

२. मला स्‍वप्‍नात ‘पू. (सौ.) अश्‍विनी पवार आम्‍हा कुटुंबियांचा सत्‍संग घेत आहेत, तर कधी माझ्‍याकडे आईसारख्‍या वात्‍सल्‍यभावाने पाहून स्‍मितहास्‍य करत आहेत’, असे दिसले.

३. एकदा मला स्‍वप्‍नात दिसले, ‘सद़्‍गुरु स्‍वाती खाडये माझ्‍याशी मधुर आवाजात बोलत आहेत.’

४. एकदा मला स्‍वप्‍नात सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे यांचे दर्शन झाले. त्‍यांनी त्‍यांच्‍या दोन्‍ही हातांनी माझ्‍या दोन्‍ही हातांना स्‍पर्श केला. दुसर्‍या दिवशी सकाळी उठल्‍यावरही मला हा भावस्‍पर्श अनुभवता आला. तेव्‍हा माझे मन पुष्‍कळ उत्‍साही आणि शांत झाले.

५. मी रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमात सेवेनिमित्त आल्‍यावर मला स्‍वप्‍नात परात्‍पर गुरु डॉक्‍टरांचे २ वेळा आणि एकदा पू. रेखा काणकोणकर यांचे दर्शन झाले.

गुरुमाऊली (परात्‍पर गुरु डॉ. आठवले) आणि अन्‍य संत मला स्‍वप्‍नात दर्शन देऊन माझ्‍यावर कृपेचा वर्षाव करत आहेत, तसेच मला चैतन्‍य देत आहेत. त्‍यामुळे माझे मन नेहमी आनंदी असते. त्‍याबद्दल मी प.पू. गुरुमाऊली आणि सर्व संत यांच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– श्री. अमित हावळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.१०.२०२१)

या अंकात प्रसिद्ध करण्‍यात आलेल्‍या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्‍तीनुसार साधकांच्‍या वैयक्‍तिक अनुभूती आहेत. त्‍या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक