अभिनेत्री राखी सावंत हिच्‍याकडून विवाहानंतर इस्‍लाम धर्म स्‍वीकारल्‍याचे मान्‍य !

आदिल खान दुर्रानी आणि राखी सावंत 

मुंबई – मुसलमान प्रियकर आदिल खान दुर्रानी याच्‍या समवेत मी निकाह केला आहे. आमच्‍यात धर्म नाही. आदिलने माझे नाव ‘फातिमा’ ठेवले आहे, असे अभिनेत्री राखी सावंत हिने सांगून इस्‍लाम धर्म स्‍वीकारल्‍याचे मान्‍य केले आहे.

आम्‍ही जात-पात मानत नाही, तसेच आम्‍हाला ‘लव्‍ह जिहाद’ म्‍हणजे काय ? हे ठाऊक नाही, असेही त्‍या दोघांनी म्‍हटले आहे. (आदिलने निकाह लपवून ठेवण्‍यास सांगितल्‍याचे राखी सावंत यांनी नुकतेच उघड केले होते. त्‍या वेळी ‘मला लव्‍ह जिहादची भीती वाटते’, असे विधान त्‍यांनी केले होते. आता ‘लव्‍ह जिहाद’ ठाऊक नसल्‍याचे सांगणे म्‍हणजे त्‍यांनी केलेले घूमजावच होय ! – संपादक)

राखी सावंत म्‍हणाल्‍या, ‘‘अभिनेता सलमान खान यांनी माझा संसार वाचवला. सलमान माझा भाऊ आहे. त्‍याने आदिलला दूरभाष करून समजावले.’’ आदिल म्‍हणाला, सलमान खान यांनी मला सांगितले की, तुमचे लग्‍न झालं आहे, हे कबूल कर. तुला कबूल करायचे असेल, तर ते कबूल कर, नाहीतर सरळ नकार दे; पण पुढे जे काय होईल, त्‍याला सामोरे जा.’’