कडेगाव (जिल्‍हा सांगली) येथील तहसील कार्यालयातील आवक-जावक विभाग तळमजल्‍यावर घ्‍यावा !

‘भगवे वादळ फाऊंडेशन’चे जिल्‍हाधिकारी यांना निवेदन

सांगली जिल्‍हाधिकारी कार्यालय 

सांगली – कडेगाव तहसील येथे आवक-जावक विभाग हा पहिल्‍या मजल्‍यावर आहे. येथे कामासाठी आलेल्‍या नागरिकांना संबंधित अधिकारी तिकीट लावण्‍यास, तसेच अन्‍य अधिकार्‍यांची स्‍वाक्षरी घेऊन येण्‍यास सांगण्‍यात येते. यामुळे सामान्‍य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. तरी कडेगाव तहसीलदारांना आपण सामान्‍य जनतेला नाहक त्रास होणार नाही, यासाठी सूचना द्याव्‍यात. याचसमवेत नागरिकांना सुविधा होण्‍यासाठी कडेगाव (जिल्‍हा सांगली) येथील आवक-जावक विभाग तळमजल्‍यावर घ्‍यावा, या मागणीचे निवेदन ‘भगवे वादळ फाऊंडेशन’च्‍या वतीने जिल्‍हाधिकार्‍यांना निवेदन देण्‍यात आले.