नवी मुंबई, १७ जानेवारी (वार्ता.) – कोकण शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत अन्य उमेदवारांनी त्यांचे अर्ज मागे घेतल्याने केवळ ८ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. १३ ते १६ जानेवारी असा अर्ज मागे घेण्याचा कालावधी होता. त्यात १३ उमेदवारी अर्जांपैकी ५ उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले आहेत, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.
ज्ञानेश्वर म्हात्रे (भाजप), धनाजी पाटील (जनता दल (युनायटेड)), बाळाराम पाटील यांच्यासह अन्य ५ जण अपक्ष निवडणूक रिंगणात आहेत. कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे मतदान ३० जानेवारी या दिवशी होणार आहे.