नवीन शैक्षणिक धोरण राबवण्‍यासाठी राज्‍यशासनाकडून समितीचे गठन !

मुंबई, १७ जानेवारी (वार्ता.) – महाराष्‍ट्रात नवीन राष्‍ट्रीय शैक्षणिक धोरण राबवण्‍यासाठी राज्‍यशासनाकडून ११ जणांची समिती स्‍थापन करण्‍यात आली आहे. शालेय शिक्षण विभागाच्‍या प्रधान सचिवांच्‍या अध्‍यक्षतेखाली ही समिती काम करेल. शिक्षण समाजकल्‍याण, महिला आणि बाल विकास, आदिवासी विकास, कौशल्‍य विकास या विभागांचे आयुक्‍त या समितीचे सदस्‍य असतील. महाराष्‍ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे प्रकल्‍प संचालक, राज्‍य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक यांचाही समितीमध्‍ये समावेश असेल. समिती वेळोवेळी विषयानुसार अहवाल सरकारकडे सादर करणार आहे.