‘लव्ह जिहाद’चा प्रकार असल्याचा स्थानिक नागरिक आणि हिंदुत्वनिष्ठ यांना संशय
सातारा, ८ डिसेंबर (वार्ता.) – पाटण तालुक्यातील मोरगिरी (पेठशिवापूर) येथील २६ वर्षीय मुसलमान युवकाने एका अल्पवयीन मुलीला दमदाटी आणि शिवीगाळ करत लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी संशयित मुसलमान युवकावर पाटण पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचार, पोक्सो आणि ॲट्रॉसिटी कलमांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हा सर्व ‘लव्ह जिहाद’चा प्रकार असल्याचा संशय स्थानिक नागरिक आणि हिंदुत्वनिष्ठ व्यक्त करत आहेत.
मोरगिरी (पेठशिवापूर) येथील एका मुसलमान युवकाने तेथीलच एका अल्पवयीन शाळकरी मुलीला १५ सप्टेंबर ते १४ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत वेळोवेळी दमदाटी आणि शिवीगाळ करत लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली. याचवेळी हा मुसलमान युवक पीडित अल्पवयीन मुलीला दमदाटी आणि मारहाण करत असल्याचे ध्वनीचित्रमुद्रण सामाजिक संकेतस्थळांवर फिरत असल्यामुळे मुलीच्या नातेवाइकांनी पोलिसात धाव घेतली. पाटण पोलिसांनी प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेत तातडीने चौकशी चालू केली. चौकशीत तथ्य आढळून आल्यावर पाटण पोलिसांनी तात्काळ मुसलमान युवकाला आणि त्याच्या एका अल्पवयीन साथीदाराला अटक केली. या प्रकरणी संशयितांना ५ डिसेंबर या दिवशी कराड येथील न्यायालयासमोर उपस्थित केले असता त्यांना४ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.
लव्ह जिहादचा संशय !
देशात श्रद्धा वालकर प्रकरण अजून ताजे असतांनाच पाटणमधील घटनेने संपूर्ण जिल्हा व्यथित झाला आहे. या घटनेमागे निश्चितच ‘लव्ह जिहाद’चा प्रकार असल्याचा संशय स्थानिक नागरिक आणि हिंदुत्वनिष्ठ व्यक्त करत आहेत. ‘पोलिसांनी या दृष्टीकोनातूनही संशयितांकडे चौकशी करावी’, अशी मागणी समाजातून जोर धरत आहे.
संशयितांचा नामोल्लेख कुठेही नाही !
पाटण तालुक्यासह सातारा जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्यासाठी पोलीस प्रयत्नरत आहेत. ४ डिसेंबर या दिवशी सातारा येथे ‘लव्ह जिहाद’ विरोधात १० सहस्र धर्माभिमानी हिंदूंनी ‘हिंदु जनआक्रोश मार्चा’ काढला होता. त्या घोषणा अजून हवेत विरत नाहीत, तोपर्यंतच ही घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे पोलिसांनी जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये; म्हणून संशयितांचा नामोल्लेख कुठेही होणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली आहे.
स्थानिक मुसलमान संघटनांचे नक्राश्रू !
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणी तातडीने पाटण येथील मुसलमान संघटनांनी आम्ही किती सामाजिक सलोखा राखतो, हे दर्शवण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनीही संशयित मुसलमान युवकाला कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे, तसेच अशा प्रवृत्तीच्या लोकांना आम्ही थारा देणार नाही, असे आश्वासन दिले आहे; मात्र जिल्ह्यात घडणारी लव्ह जिहादची प्रकरणे पहाता पाटण येथील मुसलमान संघटनांच्या नक्राश्रूंना आता कुणीही भुलणार नाही, असे मत स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.