सनातनच्या ग्रंथांच्या अद्ययावत सूची प्रसारासाठी उपलब्ध !

सनातन संस्थेच्या वतीने प्रकाशित केलेले सर्व ग्रंथ आणि लघुग्रंथ यांच्या ‘ए ४’ आकारातील अद्ययावत सूची प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या सूची दोन प्रकारांत उपलब्ध आहेत.

प.पू. भक्तराज महाराजांनी डॉ. आठवले यांना घरच्यांपासून विरक्ती येण्यासाठी दिवाळीला त्यांच्याकडे बोलवणे !

संसारात राहून साधना करणार्‍यांना घरातील माणसांपासून विरक्ती येण्यासाठी प.पू. भक्तराज महाराज असे करायला सांगायचे.’

‘विद्युत् दीप असलेली प्लास्टिकची पणती’ आणि ‘मेणाची पणती’ लावल्याने वातावरणात नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे, याउलट ‘तिळाचे तेल अन् कापसाची वात घालून लावलेल्या मातीच्या पारंपरिक पणती’मुळे वातावरणात सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी)’ या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने केलेली वैज्ञानिक चाचणी

दीपावलीच्या काळात काढावयाच्या सात्विक रांगोळ्या

अधिक रांगोळ्यांसाठी पहा सनातनचा ग्रंथ ‘सात्त्विक रांगोळ्या (भाग १)’

श्री गणेशतत्त्व आकृष्ट करणार्‍या आणि सात्त्विक सौंदर्याचा आविष्कार असलेल्या सनातनच्या आश्रमात करण्यात आलेल्या मनोहारी दीपरचना !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात श्री ऋद्धि-सिद्धिसहित सिद्धिविनायकाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. तेव्हा आश्रमात श्री गणेशतत्त्व आकृष्ट करणार्‍या विविध दीपरचनांद्वारे श्री सिद्धिविनायकाची आराधना करण्यात आली. दिव्यांचा लखलखता प्रकाश लक्ष वेधून घेतो.

लक्ष्मीदेवी कुणाकडे वास करते ?

जिथे स्वच्छता, शोभा आणि रसिकता आढळते, तिथे तर ती आकर्षित होतेच; शिवाय ज्या घरात चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्मनिष्ठ, देवभक्त, तसेच क्षमाशील पुरुष आणि गुणवती अन् पतीव्रता स्त्रिया असतात, त्या घरी वास्तव्य करणे लक्ष्मीला आवडते.

अभ्यंगस्नानाचे महत्त्व !

अभ्यंगाने, म्हणजेच स्नानापूर्वी तेल लावण्याने पिंडातील चेतनेतील प्रवाहाला अभंगत्व, म्हणजेच अखंडत्व प्राप्त होते. स्नानापूर्वी देहाला तेल लावल्याने पेशी, स्नायू आणि देहातील पोकळ्या जागृत अवस्थेत येऊन पंचप्राणांना कार्यरत करतात. पंचप्राणांच्या जागृकतेमुळे देहातील टाकाऊ वायू ढेकरा, जांभया इत्यादींद्वारे बाहेर पडतात.