अभ्यंगस्नानाचे महत्त्व !

‘अभ्यंगस्नान म्हणजे पहाटे उठून डोक्याला आणि शरिराला तेल लावून नंतर कोमट पाण्याने स्नान करणे

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

अभ्यंगस्नानात तेल लावण्याचे महत्त्व

अभ्यंगाने, म्हणजेच स्नानापूर्वी तेल लावण्याने पिंडातील चेतनेतील प्रवाहाला अभंगत्व, म्हणजेच अखंडत्व प्राप्त होते. स्नानापूर्वी देहाला तेल लावल्याने पेशी, स्नायू आणि देहातील पोकळ्या जागृत अवस्थेत येऊन पंचप्राणांना कार्यरत करतात. पंचप्राणांच्या जागृकतेमुळे देहातील टाकाऊ वायू ढेकरा, जांभया इत्यादींद्वारे बाहेर पडतात. यामुळे देहातील पेशी, स्नायू आणि अंतर्गत पोकळ्या चैतन्य ग्रहण करण्यात संवेदनशील बनतात. हा टाकाऊ वायू किंवा देहात घनीभूत झालेली उष्ण टाकाऊ ऊर्जा कधी कधी लहरींच्या रूपात डोळे, नाक, कान आणि त्वचेची रंध्रे यांतून बाहेर पडते; म्हणून तेल लावून झाल्यावर कधी कधी डोळे आणि मुख (चेहरा) लाल होते.’

– श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ