अभ्यंगस्नानाचे महत्त्व !

अभ्यंगाने, म्हणजेच स्नानापूर्वी तेल लावण्याने पिंडातील चेतनेतील प्रवाहाला अभंगत्व, म्हणजेच अखंडत्व प्राप्त होते. स्नानापूर्वी देहाला तेल लावल्याने पेशी, स्नायू आणि देहातील पोकळ्या जागृत अवस्थेत येऊन पंचप्राणांना कार्यरत करतात. पंचप्राणांच्या जागृकतेमुळे देहातील टाकाऊ वायू ढेकरा, जांभया इत्यादींद्वारे बाहेर पडतात.

प्रयोगाचे उत्तर !

अलीकडे दीपावलीच्या कालावधीत दिव्यांच्या रचनांची अनेक छायाचित्रे सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत असतात. त्या सामान्य दीपरचना आणि सनातनच्या आश्रमात करण्यात आलेल्या देवतातत्त्व आकृष्ट करणार्‍या दीपरचना यांमध्ये भेद आहे.