आळंदी नगर परिषदेने इंद्रायणी नदीत मूर्तीविसर्जनास बंदी घातल्याचे प्रकरण !

हिंदूंच्या धार्मिक स्वातंत्र्याची गळचेपी करून हिेंदूंना श्री गणेशमूर्तीचे वहात्या पाण्यात विसर्जन करू देण्यास रोखणारे धर्मद्रोही प्रशासन ! गणेशभक्तांकडून विश्वासाने घेतलेल्या श्री गणेशमूर्तींचे धार्मिक पावित्र्य जपून विसर्जन होणे अपेक्षित असतांना तसे केले जात नसल्याचे निदर्शनास आले आहे.

‘मनी लाँड्रिंग’ प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज फेटाळला !

आर्थिक अपव्यवहार प्रकरणात ‘अंमलबजावणी संचलनालया’ने (‘ईडी’ने) मागील वर्षी अनिल देशमुख यांना ११ घंट्यांच्या चौकशीनंतर अटक केली होती.

वहात्या पाण्यात श्री गणेशमूर्ती विसर्जनास मज्जाव केल्याने पुण्यात अनेक ठिकाणी भाविकांची गैरसोय !

श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी नागरिकांची गैरसोय करणारे महापालिका प्रशासन हिंदुद्वेषीच म्हणावे लागेल. धर्मशास्त्रविरोधी हौदात मूर्तीविसर्जन, रासायनिक प्रक्रियेने मूर्तीविसर्जन, मूर्तीदान हे उपक्रम न राबवता वहात्या पाण्यात भाविकांना मूर्तीविसर्जन करू दिले असते, तर त्यांची गैरसोय झाली नसती !

नाशिक येथील सप्तश्रृंगीदेवीचे मंदिर घटस्थापनेला खुले होणार !

नाशिक जिल्ह्यातील वणी येथील साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्य शक्तीपीठ असलेले सप्तश्रृंगीदेवीचे मंदिर घटस्थापनेला खुले होणार आहे. मागील ४५ दिवसांपासून मंदिर दर्शनासाठी बंद आहे.

सोलापूर प्राणीसंग्रहालयातील ७७ प्राणी हालवणार

महापालिका प्राणीसंग्रहालयाची मान्यता केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने रहित केल्यानंतर ती पुन्हा मिळवण्यासाठी महापालिका प्रयत्न करत आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.

तोकड्या कपड्यांत दर्शनासाठी आलेल्या गायिकेला पूर्ण कपडे परिधान केल्यावर दर्शनाची अनुमती !

गणेशोत्सवाचे पावित्र्य राखण्याविषयी जागृत असलेल्या ‘आझादनगर सार्वजनिक गणेशोत्सव समिती’चे अभिनंदन !

पिंपरी-चिंचवड महापालिकेची पर्यावरणाच्या विषयीची सहानुभूती केवळ गणेशोत्सवापुरतीच ! – दिगंबर काशिद, पर्यावरणासाठी काम करणारे कार्यकर्ते

पुणे महापालिकेच्या ढोंगी पर्यावरणवादाची ‘पोलखोल’ करण्यासाठी पर्यावरणप्रेमींनो संघटित व्हा !

पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व क्षेत्रीय अधिकार्‍यांनी श्री गणेशमूर्ती विसर्जनस्थळी वैयक्तिक लक्ष द्यावे ! – उल्हास जगताप, अतिरिक्त आयुक्त

‘जनसंवाद सभे’ मध्ये श्री गणेशमूर्ती विसर्जन घाटांवर महापालिकेने विसर्जनाच्या पुढील दिवसांसाठी अधिक मनुष्यबळासह सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली.

सामाजिक माध्यमांत सक्रीय राहिल्याने गोव्यातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक अधोगती, तर विद्यार्थिनी लैंगिक शोषणाच्या बळी ! – समूपदेशकांचे मत

राष्ट्राची युवा पिढी अशा प्रकारे व्यसने आणि अनैतिकता यांना बळी पडल्यास राष्ट्राचे रक्षण कोण करणार ? त्यामुळे ही केवळ सामाजिक समस्या न रहाता राष्ट्रीय समस्याच असल्याचे जाणून आतापासूनच उपाययोजना करायला हवी !

नागपूर येथील कोराडी तलावाजवळील नांदा परिसरात ४ सहस्र राष्ट्रध्वज पोत्यात भरून फेकले !

स्वातंत्र्याच्या ‘अमृत महोत्सवा’निमित्त देशात ‘हर घर तिरंगा’ मोहीम राबवण्यात आली होती. कोट्यवधी लोकांनी स्वतःच्या घरावर तिरंगा ध्वज लावला होता. अनेकांना ध्वज उपलब्ध झाले नव्हते. ‘हर घर तिरंगा’ मोहिमेमुळे देशभावना जागृत होईल, असा त्यामागचा उद्देश होता;