सोलापूर – महापालिका प्राणीसंग्रहालयाची मान्यता केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने रहित केल्यानंतर ती पुन्हा मिळवण्यासाठी महापालिका प्रयत्न करत आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली. सोलापूर प्राणीसंग्रहालयात ११६ पैकी ७७ प्राणी हालवण्याचे आदेश केंद सरकारने दिले आहेत. त्यानुसार ९ मगरी, ५१ चितळ, १५ काळवीट, २ सांबर असे ७७ प्राणी नागपूर जिल्ह्यातील गोरेवाडा येथील राष्ट्रीय उद्यानात पाठवण्यात येणार आहेत.